शेअर मार्केटच्या नावाखाली व्यापारी तसेच युवा वर्गाची केली लाखो रुपयाची लूटमार
सिंदेवाही पोलीस कोणती कार्रवाही करतात याकडे लागले आहे सर्वांचे लक्ष्य
लेखी तक्रार देऊन एक महिन्याच्या वर होऊन राहले तरी कार्रवाही झाली नाही
श्री अमोल निनावे
संपाद्क :-झुंज सत्याची
मो. नं. 9764271316
सिंदेवाही :-नवरगाव येथील एक उच्च सुशिक्षित असलेला युवक यांनी काही दिवसा अगोदर आपले शिक्षण पूर्ण करून नवरगावला राहत्या घरी येऊन घरूनच शेयर मार्केटचा काम करू लागला.
मात्र त्याने आपल्या शिक्षणाचा उपयोग युवा वर्ग तसेच काही व्यापारी वर्गाला आपल्या शेयर मार्केटच्या वेवसायातून लाखो रुपये कसे लुटता येणार या कडे दिमाख लावला. त्यामुळे त्यांनी नवीन अक्कल लावत ज्यांचे कडे पैसे आहे अश्यांकडे जाऊन बसायचा व मित्र म्हणून त्यांना मी शेयर मार्केट मधून रोजाना कमीत कमी 10,000ते 30,000 कमवितो असे सांगून मंत्रमुग्ध करायचा त्यामुळे समोरच्याना पण असे वाटायचे कि खरोखरच हा वेक्ती एवढे पैसे कमवीत असेल म्हणून ते सुद्धा त्याच्या प्रलोभनाला पडून आपल्याकडील असललेली जमा पुंजी त्या वेक्तीला देऊन द्यायचे. त्यांनी दिलेल्या पैसेवरती तो वेक्ती त्यांना महिनाला काही % देऊन खुश करायचा त्यामुळे सुरुवातीला वेव्हार सुखरूप झाले मात्र अनेक लोकांनी आपले पैसे गुंतविल्या नंतर करोडो रूपये त्याच्याकडे जमा झाले व त्यांनी लोकांच्याच पैसे वरती आलिशान महागड्या गाड्या घेणे सुरु केले व त्यामुळे लोकांना पण वाटायचे कि त्यांनी शेयर मार्केट मधून खूप पैसे कमविले व मोठं मोठे कपंनीचे महागड्या गाड्या घेऊन फिरत आहे म्हणून लोकांनी पण आणखी पैसे देणे सुरु केले.
मात्र एक दिवस असा आला कि त्यांनी कुणालाहि एकही रुपये वापस केले नाही व त्यांनी घेतलेल्या महाग गाड्या सुद्धा गिरवी ठेवली तेव्हा लोकांना जाग आली व त्यांनी त्याला दिलेल्या पैसेची मागणी केली असता तो वेक्ती फ्रॅड निघाला व एकच चर्चा नवरगाव मध्ये रंगली, या चर्चेला उधाण येऊन अखेरीस ज्यांचे पैसे गेले त्यांनी लगेच पोलीस स्टेशन गाठून लेखी रिपोर्ट दिली. सिंदेवाही पोलीस यांनी या सर्व विषयावरती चौकशी सुरु केली असून अजूनही मात्र त्या वेक्ती वरती कार्रवाही झालेली नाही. सर्वांच्या नजरा त्या वेक्तीवरती कार्रवाही केव्हा होणार याकडे लागले असून आता नवरगाव मध्ये या विषयावरती चर्चा आणखीच जोर पकडताना दिसत आहे.





