श्री अमोल निनावे
संपाद्क:-झुंज सत्याची
मो. नं. 9764271316
सिंदेवाही :-आज दिनांक 18/08/2026 रोजी 11/00 ते 15/30 वा. दरम्यान सिंदेवाही तालुक्यातील महाविद्यालयात सिंदेवाही पोलीस स्टेशनच्या वतीने अंमली पदार्थ विरोधी प्रतिज्ञा घेण्यात आली. तसेच अमली पदार्थ, सायबर गुन्हे, पॉक्सो कायदा, ट्रॅफिक नियम बाबत जागरूकता करण्यात आली यावेळी सिंदेवाही तालुक्यातील महात्मा फुले विद्यालय सिंदेवाही येथे मार्गदर्शन करण्यात आले तेव्हा शाळेतील शिक्षक 12 व विधार्थी संख्या 400 ते 450 अंदाजे उपस्थित होते.
तसेच सर्वोदय कन्या विद्यालय सिंदेवाही इथे एकूण शिक्षक 25 व विधार्थी 700 ते 800उपस्थित होते. श्री ज्ञानेश महाविद्यालय नवरगाव
येथे शिक्षक 15 व विधार्थी 1000 ते 1200 उपस्थित होते.
असे एकुन 52 शिक्षक व विद्यार्थी 2400 तसेच नगर पंचायत , येथिल 3 नगराध्यक्ष नगरसेवक 1 तसेच 7 शाळेचे व्यवस्थापक,सचिव
हजर होते.
नशामुक्त मार्गदर्शन यशश्वी रित्या पार पाडण्याकरिता सिंदेवाही पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री कांचन पांडे साहेब तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक सौ. भोंडवे मॅडम, सहाय्यक पोलीस निरीक्षक मेश्राम सर तसेच पोलीस उपनिरीक्षक श्री लांजेवार सर यांनी मोलाचे मार्गदर्शन करून नशामुक्ती वरती मोलाचे मागर्दर्शन करून जनजागृती केली.






