श्री अमोल निनावे
संपाद्क:-झुंज सत्याची
मो.नं. 9764271316
सिंदेवाही मधील पंचायत समिती मध्ये अनेक अस्थिव्यंग दिव्यांग व्यक्ती यांची तपासणी करून व त्यांना तात्काळ मोफत कृत्रिम अवयव तसेच /आवश्यक साहित्य वाटप शिबीर यशस्वीरित्या संपन्न झाले.
शिबिरात एकूण 53 दिव्यांगांची तपासणी करण्यात आली त्यापैकी 40 दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम अवयव/आवश्यक साहित्य प्रदान करण्यात आले. एस आर ट्रस्ट मध्यप्रदेश, एलिमको मुंबई, जिल्हा परिषद चंद्रपूर व पंचायत समिती सिंदेवाही यांचे संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमात सिंदेवाहीचे विस्तार विस्तार अधिकारी आत्माज मोरे उपस्तित होते.






