विवेक नगर येथील पाण्याच्या टाकीजवळ एक करोड रुपयाचे केवळ गार्डनचे काम सुरु
श्री अमोल निनावे
संपाद्क:-झुंज सत्याची
मो. नं. 9764271316
सिंदेवाही :-सिंदेवाही नगरपंच्यात मधील एक अजब गजब कारभार लोकांना प्रश्ना मध्ये पाडत असल्याने लोकांमध्ये चर्चाचे विषय बनलेला आहे.
ज्या लोणवाही मध्ये आज पर्यंत साधे नाल्या व रस्त्याचे काम पूर्ण होऊ शकले नाही त्या ठिकाणी मात्र एका ठराविक ठिकाणच्या जागेसाठी एक करोड रुपयाचे निधी मंजूर करून गार्डन बनवण्याचे काम सुरु असल्याने लोकांमध्ये त्या कामाबद्दल व ज्यांनी काम आणले आहे अश्या वेक्ती बद्दल कुतुहूल वेक्त होत आहे.
रस्त्यात खड्डे कि खड्यात रस्ते अशी अवस्था सिंदेवाही मधील लोणवाही या ठिकाणची झालेली आहे. त्यामूळे सर्व लोणवाही वाशीय नागरिकांना अगोदर रस्ते व नाल्याची गरज असल्याने सर्व नागरिक रोडच्या व नाल्याच्या प्रतीक्षेत असताना मधेच कुठे तरी गार्डन साठी नगरपंच्यात मध्ये एक करोड रुपयाचा निधी केवळ फक्त आणि फक्त लोकांना फिरण्यासाठी व खेळण्यासाठी मंजूर झाल्याने लोकांच्या मनात विचार निर्माण होऊ लागलेले आहे.
नेमका निधी कशाला येते आणि कशाला नाही. कामाचे महत्व हे लोकांना सेवेसाठी असते कि दिशाभूल करण्यासाठी असे अनेक प्रश्न आता लोणवही वाशीय जनतेच्या मनात पडलेले आहे.
शिवाजी चौक ते रेल्वे स्टेशनचा भाग हा पूर्णपणे लोणवाही मध्ये येतो व तिथली वेवस्थेचा विचार केले असता साधे जाने येणे करायला रोड नाही, नाल्या नाही, लोकांना आपले स्वतःचे पैसे खर्च करून घरासमोरून मुरूम टाकून तात्पुरती रोडावरती जाने येने करण्याकरिता वेवस्था करावी लागतो आहे मात्र 5 वर्षांपासून नगरपंच्यातने लोणवाही परिसरात कोणताही विकास केलेला नाही. त्यात आता आणखी एक भर असे कि एक करोड रूपये खर्च करून विवेक नगर येतील पाण्याच्या टाकीजवळ गार्डन बनत असल्याने कमालीची नाराजी पसरली आहे.
पावसाळा सुरु झाला मात्र अजून पर्यंत नाली सफाई झाली नाही, रस्ताच्या बाजूला असणारा कचरा साफ झाला नाही मात्र एक करोड रुपये निधी असलेला काम मात्र अगोदर सुरु झाला त्यामुळे नेमका विकास कोणाचा गावाचा कि.. ?त्यामुळे लोणवाही येथील सर्व नागरिक यांनी एकत्र येऊन नेमका आपल्या लोणवाही विकासाकरिता कोणते काम करू द्यावे व कोणते नाही यावर आवाज उचलेले पाहिजे असे विचार आता चौकाचौकात लोकांच्या चर्चेतून दिसून येत आहे.







