B.C मातृभूषण मोठघरे यांच्या चाणिक्य नीतीने मिळाले आधार
श्री अमोल निनावे
संपाद्क :-झुंज सत्याची
मो. नं. 9764271316
नवरगाव :-मागील अनेक वर्षांपासून केंद्र शासनाने सर्वच राष्ट्रीयकृत बँकांच्या मार्फतीने प्रधान मंत्री जीवन ज्योती विमा योजनेची सुरवात केली.या विम्याला सद्यस्थितीत 436 ₹ या वार्षिक देय एकदाच प्रमाणे श्री. यादव किसन गोबाडे मु.देलनवाडी ता. सिंदेवाही जी. चंद्रपूर यांनी हा विमा बँक मित्र मातृभूषण दामोधर मोटघरे यांच्या देलनवाडी येथील B.C. Point मधून हा विमा काढलेला होता .परंतु नुकताच त्याचा 04 एप्रिल 2026 ला. आजारपणातून मृत्यू झाला असल्याने .घरच्यांनी बँकेत विचारपूस केली असता.बँक मित्र मातृभुषण मोटघरे यांच्या पुढाकाराने .त्यांचे वारसदार म्हणून त्यांच्या पत्नी सौ. शीला यादव गोबाडे यांना 2 लाख रुपयांचा धनादेश . अवघ्या एका आठवड्याच्या अंतरात जलद गतीने हा लाभ मिळवुन देण्यात बँकेने सहकार्य केले.आपल्या कुटुंबाला या सहाय्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे. आपण ही रक्कम प्राप्त करून योग्य प्रकारे उपयोग करावा.
यावेळी मा.शाखा प्रबंधक प्रकाश पांडा सर व अधिकारी आशिष रामटेके,व कुमार सर यांच्या हस्ते धनादेश वितरित करण्यात आला . महत्वाचे म्हणजे मागील 5 वर्षात केवळ देलनवाडी येथील ग्राहक सेवा केंद्रातून 10 जीवन ज्योती तर 3 सुरक्षा विमा या योजनांचा लाभ मिळवून देण्याचे कार्य बँक मित्र मातृभूषण दामोधर मोटघरे यांच्या मदतीने नवरगाव शाखेने केलेले आहे.






