मुजोर असलेले प्रशासनातील अधिकारी कि कमकुवत असणारे राजकीय लोक असे प्रश्न सर्वसामान्य नागरिकांच्या मुखातून पडू लागलेले आहे
श्री अमोल निनावे
संपाद्क:-झुंज सत्याची
मो. नं. 9764271316
सिंदेवाही मधील मुख्य मार्गावरती अनेक वाहने सुसाट्याने जात असल्याने बरेच अपघात झालेले आहे. त्यामुळे सिंदेवाही मधील काही राजकीय पक्षातील पदाधिकारी तसेच सामाजिक कार्यकर्ते यांनी या वारंवार होणाऱ्या अपघाताला आळा घालण्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच तहसील ऑफिसला गतिरोधक लावण्याकरिता लेखी निवेदन दिले तसेच आंदोलन करण्याचा इशारा पण दिले होते.
तरीपण वर्ष उलटून गेले पण अजूनही सार्वजनिक बांधकाम विभागाने अजूनही कुठेच गतिरोधक लावलेला नाही. त्यामुळे आता लोकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे नेमका राजकीय तसेच सामाजिक लोकांचे सिंदेवाही मधील अधिकारी लोकांवरती कोणतेही प्रकारचा वर्चस्व राहलेला नाही त्यामुळे अधिकारी आता खुलेआम त्यांना जेव्हा वाटेल तेव्हा ते काम करतील. त्यांना आता कुणाचाही धाक राहलेला नाही.
ज्यांनी केवळ आंदोलन करण्याचे इशारे दिले होते त्यांनी मागणी पूर्ण नं झाल्याने आंदोलन का केले नाही अशाप्रकारे वेगवेगळे प्रश्न आता सिंदेवाहीतील सुजाण नागरिकांमध्ये पडून राहलेले आहे. त्यामुळे आता राजकीय तसेच सामाजिक कार्यकर्ते हे नेमकी भूमिका कोणती घेतात याकडे सर्वांचे लक्ष्य लागलेले आहे.






