प्रत्येक वेक्तीला आपल्या कामाकरिता मोजावे लागतो 50 ते 100 रु
श्री अमोल निनावे
संपाद्क:-झुंज सत्याची
मो. नं. 9764271316
सिंदेवाही तहसील येथील अनेक कर्मचारी यांचे पदे रिक्त झाले असून अजूनही त्या पदावरती दुसऱ्या कर्मचारी यांची निवड न केल्याने एक दिवसाचा काम आठ दिवसा वरती किंवा 15 दिवसावरती ढकल्या जात असल्याने तसेच ज्या पदावरती कर्मचारी नियुक्त नाही अश्या पदावरती रिटायर कर्मचारीच नियुक्त असल्याने त्यांना सुद्धा लोकांनाच पैसे मोजून द्यावे लागत असल्याने सिंदेवाही तालुक्यातील लोकांमध्ये नाराजी वेक्त होताना दिसत आहे.
अखेरीस सिंदेवाही तहसीलचे असे भोंगळ कारभार केव्हा बंद होणार. सिंदेवाही तहसीलचे बांधकामाचे कामे फक्त मोठे बिल्डिंग झाले असून कर्मचारी विना ती पोरकी झाली आहे असे म्हणाला काही हरकत नाही.
शासनाने ज्या जागेचे पदे रिक्त झाले आहे अश्या जागेवरती त्वरित पद नियुक्ती करून लोकांचे कामे सुरळीत करावे अशी मागणी सिंदेवाही तालुक्यातील नागरिकांकडून होत आहे.






