वारंवार सूचना प्रशाषनाला देऊन सुद्धा रोडच्या बाजूला स्लोप नं भरल्यामुळे लाडबोरी या भर गावात भारत गुणवंत बोरकर यांची गाडी स्लोप झाल्याने मृत्यू
राजकीय वेक्ती मात्र झोपेच्या सोंगेत अजूनही त्या रोडावरती कोणत्याही राजकीय पुढारी यांनी आवाज उठविलेला नाही
आमदार श्री विजय वड्डेटीवार यांनी विधासभेत हा विषय मांडला मात्र त्या वरती शासनाने कोणतेही गांभीर्यपणे लक्ष्य नं दिल्याने रोडचे अवस्था जैसे थेच
श्री अमोल निनावे
संपाद्क :-झुंज सत्याची
मो. नं. 9764271316
सिंदेवाही तालुक्यातील रस्त्याची अवस्था बिकट असून त्यात नवरगाव ते सिंदेवाही मार्ग पूर्णपणे खराब झालेला आहे. केवळ डागडुगी लावण्याचे काम प्रशाषण करीत आहे.
नवरगाव ते सिंदेवाही मार्गावरती लाडबोरी या गावजवळ रोड उंच झाले असून रोडाच्या बाजूला कोणताही स्लोप भरला नसल्यामुळे दोन चाकी वाहन चालकाला आपली गाडी वरती चढविताना किंवा उतरविताना आपले जीव धोक्यात घालून गाडी चालवावी लागतो. अश्यातच दोन दिवसा अगोदर सिंदेवाही तहसील मधील कर्मचारी हे लाडबोरीच्या वळण मार्गावरतीच रोडच्या खाली आल्याने स्लिप होऊन पडले त्यांना डोक्याला तसेच हाताला जखम झाली होती.
मात्र आज एका रोजगार करणारे होतकरू असलेले नवरगावचे भारत गुणवंन्त बोरकर यांचा लाडबोरी इथे रस्त्याच्या बाजूने तोल गेल्याने जीव गेला. त्यामुळे या रोडावरती प्रश्न निर्माण झाले आहे. असेच रोड कायमस्वरूपी राहल्यास रोज कोणाला ना कोणाला आपले जीव गमवावे लागणार हे निश्चित.
अनेक लोकांचे चार चाकी वाहन रोडा मुळे खराब झालेले आहे. अनेकांना आपले जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असल्याने लोकांमध्ये नाराजीचे सूर वाहत असून या रोडचे लवकरात लवकर रुंदीकरण करून स्लोप पूर्णपणे भरावे अशी मागणी होत आहे.
या अगोदर सामाजिक युवा ब्रिगेड संघटनेच्या वतीने नवरगावच्या फाट्यावरती धरणे आंदोलन केल्याने रोडच्या बाजूला स्लोप भरले होते मात्र आणखी तशीच अवस्था झाल्याने आणखी नव्याने मुरूम टाकून स्लोप भरणे गरजेचे आहे.
राजकीय पुढारी झोपेच्या सोंगेत असल्याने कोणीही या रोडाचा प्रश्न उपस्तित करताना दिसत नाही हे विशेष.
एका तरुण वयाचा तसेच मुलं बाळ असलेल्या होतकरू वेक्तीचा जीव गेल्याने नवरगाव मध्ये शोककळा पसरली आहे. तसेच शासनाने योग्य तो मोबदला द्यावा अशी मागणी कुटुंबा कडून होत आहे.






