हा माझा मालकीचा हॉस्पिटल आहे आताचा आता इथून बाहेर निघा अशी अर्वाच भाषेचा वापर
डॉक्टरला देवाचे रुप मानतात मात्र डॉक्टरच रुग्णाला धमकी देतात
श्री अमोल निनावे
संपाद्क :-झुंज सत्याची
मो. नं. 9764271316
नागभीड :-नागभीड येथील डॉ आशिष दा. सेलोकर यांचा गुरुदेव मॅट्रीनिटी हॉस्पिटल मध्ये गर्भपात करण्याचे सरकार मान्य केंद्र आहे. त्यामुळे ज्या रुग्णाचे सोनोग्राफी रिपोर्ट हे प्रॉब्लेमॅटिक आले असे रुग्ण डॉ. च्या सल्यानुसार गर्भपात च्या ठिकाणी होते अश्या ठिकाणी पाठवतात किंवा रुग्णांना वाटेल त्या ठिकाणी जातात. मात्र जेव्हा रुग्ण या हॉस्पिटल मध्ये जाऊन डॉक्टर ला रिपोर्ट दाखवितो तेव्हा डॉ हे सरळ आमच्या कडे तीन महिन्या पर्यंतच्या आतच गर्भपात करण्याचा आदेश आहे असे नं सांगता रुग्णाला उलटसुलट सला देऊन त्यांची मानसिकता अजून खची करण्याचा पर्यंत करतात.
असाच प्रकार आज एका रुग्ण सोबत झालेला आहे. रुग्णांना अगोदर तुम्हला ब्रह्मपुरीला हॉस्पिटल मध्ये जाल तर 60 ते 70 हजार लागतात. नागपूरला जाल तर 80 ते 90 हजार लागतात. “एक तर दमडी जाईल नाहीतर चमडी जाईल”, अश्या भाषेचा वापर करून रुग्णांना उद्धट पणे सांगण्याचा पर्यंत येतील हॉस्पिटलचे डॉक्टर करीत असल्याने रुग्णांनं मध्ये नाराजी निर्माण होताना दिसत आहे.
डॉक्टर च्या पोर्च मध्ये रुग्ण तपासण्याची फीचे बोर्ड लावले असून त्याठिकाणी प्रत्येक अर्धा एक तासाच्या वेळेनुसार अधिक फी आकारली जाईल असे नमूद केलेले आहे.
सकाळी 9 वाजता पासून तर 2 वाजेपर्यत 200 रु.
दुपारी 2 वाजतपासून तर 3 वाजेपर्यंत 250 रु आणि 3 वाजता पासून तर 6 वाजेपर्यंत 300 रु. अश्याप्रकारे प्रत्येक तासाला एकाच दिवशी आपल्या मर्जीने फी लावत असल्याने रुग्णांना आपण नेमके कोणत्या वेळेत जावे व हे कशाप्रकारचे वेळेनुसार फी आकारली जाते असे एकमेव हॉस्पिटल आपल्या ग्रामीण भागात निर्माण झाल्याने लोकांमध्ये चीड निर्माण होऊन संभ्रम निर्माण झालेला आहे.
डॉक्टरची बोलण्याची आणि समजवून सांगण्याची भाषा पूर्णपणे अरेरावीची त्यामुळे अगोदरच रुग्ण आपल्या बिमारीने त्रस्त झालेला असतो त्यात अश्या डॉक्टर कडे गेल्याने आणखीच त्रास सहन करावा लागत असल्याने मानसिक तसेच शारीरिक त्रास रुग्णांना होताना दिसत आहे. रुग्णांना उध्दट पणाने हा माझा हॉस्पिटल आहे तू या हॉस्पिटल मध्ये निघून जा अशी भाषा वापरणे, योग्य सला द्यायचे तर उलट सुलट बोलून सला देणे त्यामुळे अश्या खाजगी हॉस्पिटल वरती वरिष्ठ अधिकारी तसेच प्रशाशने योग्य ती हॉस्पिटलची तसेच तिथे लावल्या बोर्डची व डॉक्टरची चौकशी करून योग्य ती कार्रवाही करावी अशी मागणी चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड, सिंदेवाही तालुक्यातून होत आहे.बऱ्याच लोकांच्या तक्रारी या डॉक्टर बद्दल आजपर्यंत आहेत मात्र कोणीही आजपर्यंत समोर होऊन आवाज उचला नसल्याने यांची अरेरावी वाढताना दिसत आहे.





