सिंदेवाही तालुक्यात समृद्ध संजीवनी संस्थेचा उपक्रम
श्री अमोल निनावे
संपाद्क:-झुंज सत्याची
मो. नं. 9764271316
चंद्रपूर : शेतकऱ्यांचा शेतीवरील वाढता खर्च कमी करण्यासोबतच जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी समृद्ध संजीवनी बहुउद्देशीय संस्था, यवतमाळ यांच्या वतीने सिंदेवाही तालुक्यातील कळमगाव, इटोली, खातेरा, सरांडी, खांडला तसेच इतर गावांमध्ये शेतकऱ्यांना ३५% सवलतीत सेंद्रिय खताचे वितरण करण्यात येत आहे.
रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम कमी व्हावेत, शेतकऱ्यांचा अनावश्यक खर्च कमी व्हावा आणि शेतीची जमीन अधिक काळ सुपीक राहावी, या उद्देशाने संस्थेने हा उपक्रम हाती घेतला आहे. शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीकडे प्रोत्साहित करण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून तीन वर्षांपर्यंत सबसिडीच्या स्वरूपात सहकार्य करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
यासोबतच ग्रामीण भागातील महिला स्वावलंबी व्हाव्यात आणि त्यांना रोजगाराच्या संधी गावातच उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने संस्थेच्या माध्यमातून शिवणयंत्र प्रशिक्षण, ब्युटी पार्लर प्रशिक्षण तसेच मेहंदी प्रशिक्षण यांसारखे उपक्रमही राबविण्यात येत आहेत.
या उपक्रमामागे शेतकरी व ग्रामीण महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा तसेच गावागावात रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे.
या उपक्रमासाठी संस्थेचे संस्थापक प्रफुल चौथे सर, विदर्भ हेड सूर्यकांत सहारे सर, प्रशिक्षण अधिकारी ह.भ.प. शरद सहारे सर, चंद्रपूर प्रतिनिधी सविता चौखे मॅडम, सिंदेवाही तालुका प्रतिनिधी विलास चौधरी सर, क्षेत्र प्रतिनिधी शांताराम आदे सर तसेच संस्थेचे इतर कर्मचारी परिश्रम घेत आहेत.
समृद्ध संजीवनी बहुउद्देशीय संस्था, यवतमाळ यांच्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीसाठी प्रोत्साहन मिळून शेतीचा खर्च कमी होण्यास आणि जमिनीचे आरोग्य जपण्यास निश्चितच मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.







