श्री अमोल निनावे
संपाद्क:-झुंज सत्याची
मो. नं. 9764271316
सिंदेवाही तालुक्यातील सिरखेडा येथील महिला 18/12/2025 पासून मिसिंग होती. त्यानुसार सिंदेवाही पोलीस स्टेशनला गोपिका नामदेव धुर्वे वय 50 हि त्या महिलेची मुलगी पोलीस स्टेशनला येऊन . तिची आई बहिणाबाई कुंभरे हि मिसिंग असल्याची रिपोर्ट दिली होती.
त्यानुसार सिंदेवाही पोलीस स्टेशन मध्ये नोंद करण्यात आली. त्या माहितीनुसार सिरखडा या गाववरुन पुरकेपार या गावाला जायला 15/12 /2025 तारिखला तिची आई बहिणाबाई भाऊराव कुंभरे रा सिरखडा, हि निघाली होती मात्र ती पुरकेपार या ठिकाणी पोहचलेली नाही. तशीच ती थोडी वेळ्सर असल्याने व पायी निघाल्याने आणि रस्ता पूर्णपणे जंगली असल्यामुळे भीती निर्माण झाली अशी माहिती दिली त्यानुसार मुलीच्या रिपोर्ट अनुषंगाने सिंदेवाही पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी तपास कार्य सुरु केले. सिरखेडा ते पुरकेपार या गावाच्या मध्ये असलेल्या खाम्बाडा या गावातील लोकांकडून विचारपूस केली तसेच गावात जाऊन लोकांचे बयान पोलिसांनी नोंद केले होते. त्यानुसार ती महिला जन्गलाच्या दिशेने गेली अशी प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिसांनी फॉरेस्ट विभाग, पोलीस टीम, पोलीस पाटील यांची मदत घेऊन जन्गलाच्या दिशेने तपास सुरु केले होते. मात्र घनदाट जंगल तसेच खूप मोठा असल्याने तसेच हिरवगार व मोठं मोठे झुडूप असल्याने शोध घेणे कठीण झाले.
मात्र काल दिनांक 18/4/2026 रोजी खाम्बाडा येथील काही लोक काड्या जमा करणे तसेच तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेले असता काही लोकांना एक साडी दिसली व काही कुजलेल्या स्वरूपाचे हाडांचे अवशेष दिसले त्यानुसार पुरकेपार ला जाऊन त्या लोकांनी मिसिंग असलेल्या त्या बाईच्या मुलीला सांगितले व त्या मुलीने लगेच आपल्या भावाला नाव देवेंद भाऊराव कुंभरे याला माहिती दिली. भाऊ हा स्वतः आल्यानंतर त्यांनी ते अवयव पाहून तसेच साडीला पाहून ओळख दाखविली व हि साडी माझ्या आईची आहे असे सांगितले. त्यानुसार सिंदेवाही पोलिसांनी तपास कार्य समोर नेवून साडी व हाडांचे अवशेष जमा केले.व दिनांक 19/4/2026 ला देवेंद भाऊराव कुंभरे यांच्या तोंडी रिपोर्ट नुसार सिंदेवाही पोलीस स्टेशनला मर्ग दाखल केले. समोरील तपास करिण्याकरिता त्या अवशेषला बॉडी हि त्या महिलेचीच आहे कि नाही हे चेक करण्याकरिता DNA तपासण्याकरिता पाठविण्यात आले अशी माहिती सिंदेवाही पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री कांचन पांडे यांनी दिली. समोरील तपास सिंदेवाही पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री कांचन पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत लांजेवार हे करीत आहेत.






