सिंदेवाही मधील वारंवार होणाऱ्या लाईन बंदचा अखेरीस मार्ग विदयुत विभागणी काढला
श्री अमोल निनावे
संपाद्क:-झुंज सत्याची
मो. नं. 9764271316
सिंदेवाही तालुक्यातील लाईनचा या आठ दिवसात खूप मोठे प्रॉब्लेम सुरु होते त्यामुळे नाहक त्रास विदयुत विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांना तसेच गाववासीय जनतेला होत होता. आणि हे प्रॉब्लेम फक्त उन्हाळ्याच्या दिवसात शीतकरण यंत्रांचा वापर वाढल्याने विजेची मागणी उच्चांकी पातळीवर पोहोचत असल्यामुळे होत होती. सिंदेवाही येथील ३३केव्ही उपकेंद्रावर सध्या प्रचंड ताण वाढत असल्यामुळे आणि वाढत्या लोडमुळे ट्रान्सफार्मरमधील तेल गरम होते, त्यातच बाहेरचे तापमान ४४ अंशांवर पोहोचल्याने यंत्रणेवर दुहेरी मारा होत असल्याने ट्रान्सफॉर्मर मर्यादेपेक्षा जास्त तापल्यास त्यात तांत्रिक बिघाड होऊन स्फोट होण्याची किंवा वीज पुरवठा दीर्घकाळ ठप्प होण्याची भीती असते. ही आपत्कालीन स्थिती टाळण्यासाठी महावितरण अधिकारी कर्मचाऱ्यांनी ही ‘थंडावा’ देणारी शक्कल लावली आहे.आणि जिथे मशीनरी यंत्र आहे तिथे कूलर लावून त्यांना थंड राहण्यासाठी व लाईनचा वारंवार जनतेला त्रास होऊ नये म्हणून अक्कल लढवली आहे. त्यामुळे सिंदेवाही तालुक्यातील रहिवाशीय जनतेनी विदयुत विभागाचे आभार मानले आहे.






