40 लिटर अवैध पेट्रोल आढळून आले
पेट्रोल पम्प मालकावरती पण कारवाही करण्याची मागणी
श्री अमोल निनावे
संपाद्क:-झुंज सत्याची
मो. नं. 9764271316
सिंदेवाही :-इराण, अमेरिका v इज्राइल या देशा मध्ये सुरु असलेल्या युद्धाचा भडका अन्य देशावर्ती पडत असल्याने भारतात सुद्धा हाच भडका इंधन साठ्यावरती पडलेला आहे. सिंदेवाही तालुक्यात अनेक दिवसापासून युद्ध जन्य परिस्थितीचा भडका पेट्रोल तसेच गॅस वरती पडताना दिसत आहे. सर्व राज्यात, जिल्ह्यात, तालुक्यात, गावात पेट्रोल मुबलक प्रमाणात मिळत नसल्याने बरेच लोकांना पेट्रोलच्या बाबतीत समश्या निर्माण झालेले दिसत आहे.
अश्यातच सिंदेवाही शहरात दोन ते तीन दिवसा नंतर पेट्रोलची गाडी पेट्रोल पम्प वरती येत असल्याने आणि ते पण 12 तासातच खतम होत असल्याने लोकांना पेट्रोल मिळणे कठीण झाले आहे.
याचाच फायदा घेत काही सिंदेवाहीतील ऑटोमोबाईलच्या दुकानदारांनी वाजवी पेक्ष्या जास्त पेट्रोलचा साठा गोळा करून अवैध रित्या पेट्रोल विक्री करणे सुरु केले होते.
नाईलाजास्तव बाहेर गावच्या लोकांना ते पेट्रोल घेणे गरजेचे असल्याने त्यांना एक लिटर मागे 50 रु ते 80 रु जास्तचे पैसे मोजून द्यावे लागतो आहे.
हि माहिती सिंदेवाही पोलिसांना माहिती होताच स्वतः सिंदेवाही पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री कांचन पांडे यांनी सिंदेवाही परिसरात शोध मोहीम सुरु केले व यात सिंदेवाही मधील शिवाजी चौकात असलेल्या श्रीकृष्ण ऑटोमोबाईलच्या दुकानात पंचासह तपासणी केले असता.40 लिटर अवैध पेट्रोल साठा आढळून आले . त्यामुळे या दुकानाचे मालक असलेले रामकृष्ण दादाजी अगळे यांच्या वरती कलम 3,7 जीवनावश्यक वस्तू कायदांतर्गत अवैध पेट्रोल साठा विक्री प्रमाणे कलम लावून कार्रवाही करण्यात आली.
या मुळे अवैध पेट्रोल विक्री करणाऱ्याचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. मात्र एवढा मुबलक प्रमाणात पेट्रोल देणाऱ्या सिंदेवाही मधील पेट्रोल पंपावर्ती पण कार्रवाही झाली पाहिजे अशी मागणी जोर धरीत आहे.
बरेच पेट्रोल पंपावर्ती दोन दिवसा नंतर पेट्रोल उपलब्ध होत आहे आणि दोन चाकी गाडी मध्ये 200 रु तसेच चार चाकी वाहन मध्ये 500 रु या प्रमाणे पेट्रोल दिल्या जात आहे. मग या अवैध विक्री करणाऱ्या दुकानदाराकडे एव्हढा मोठा पेट्रोल उपब्लध कसा झाला यावर चौकशी करून अश्या पेट्रोल पम्प मालकांवरती कार्रवाही करावी अशी मागणी सिंदेवाही जनतेकडून होत आहे.






