अशोक सागरे एजन्शी एक्सपर्ट साबण सिंदेवाही यांचा मालकीचा मालवाहतुक इ रिक्षा
श्री अमोल निनावे
संपाद्क:-झुंज सत्याची
मो. नं. 9764271316
नवरगाव मधील महादेव मोहल्ला येथील रहिवाशी महेश गहाणे यांची मुलगी श्रीजा महेश गहाणे वय अडीच वर्ष हि घरासमोर खेळत असताना ती आपल्या वडिलांकडे जायला निघाली.मात्र अचानक भर वेगात एक्पर्ट साबनाच्या मालाने भरलेल्या माल वाहतूक इ रिक्षा चालकाने त्या मुलीकडे नं बघता तिला जागेतच उडविल्याने वडिलांच्या समोर मुलीचे अपघात होऊन गेले प्राण.
सदर घटना हि आज दिनांक 19/7/2026 रोज रविवारला ठीक सकाळी 11.30 च्या दरम्यान घडली. त्यामुळे नवरगाव मध्ये शोककळा पसरली असून त्या वाहन चालका विरोधात संताप वेक्त होत आहे. चालक हा लाडबोरी मधील प्रेमा नारायण चहांदे असून त्याला सिंदेवाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र वडिलाच्या समोर मुलीचे प्राण गेल्याने वडिल तसेच गहाणे परिवारावर्ती दुःखाचे डोंगर पसरलेले आहे. समोरील तपास सिंदेवाहि पोलीस करीत आहे.







