लोणवाहीत वाघाच्या दहशती सोबत आता लाईनची दहशत निर्माण झाली आहे.
आठ ते दहा दिवसापासून लोणवाही परिसरातील लाईन भर दिवसा आणि रात्रौला जात असल्याने लोणवाही परिसरातील लोकांमध्ये असंतोष
श्री अमोल निनावे
संपाद्क:-झुंज सत्याची
मो. नं. 9764271316
सिंदेवाही मध्ये सतत आठ ते दहा दिवसापासून काहींना काही कारणासाठी लाईन चालू बंदच्या अवस्तेत असल्याने लोकांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे.
शासनाने दोन दिवसा अगोदरच एक परिपत्रक जाहीर करून लोकांना उष्णते पासून बचाव कसे करायचे या बद्दल उपाय योजना सुचविले आणि कामानिमित्यच घराच्या बाहेर पडावे अन्यथा पडू नये अशी माहिती दिली असताना बरेच लोक आता घरी राहून सुरक्षित कसे राहता येणार या कडे लक्ष्य देऊन घरीच राहायला लागले आहे. मात्र सिंदेवाही मध्ये सतत भर दिवसा 12 ते 1 वाजताच्या दरम्यानच रोज लाईन जात असल्याने लोकांना उन्हाचे चटके सहन करावे लागत आहे. नेमके रोज लाईन जाण्याचे कारण काय ?हे आता लोकांच्या मनात प्रश्न पडू लागले आहे. हे लपंडाव आणखी किती दिवस सुरु राहणार असेच सुरु राहल्यास एक दिवशी उष्मघाताचा नक्कीच कोणीना कोणी बळी पडणार हे निश्चित. त्यामुळे यावरती आवर्जून विदयुत विभागाच्या वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष्य देऊन लाईन वारंवार बंद का होत आहे याकडे लक्ष्य देऊन त्यावर उपाय योजना करावे अशी मागणी सिंदेवाही वाशीय तसेच लोणवाही वाशीय जनतेकडून होत आहे.सतत रोज रात्रौला 12 ते 1 वाजताच्या दरम्यान लोणवाही गावातील काही dp वरचे फुज जात असल्याने बऱ्याच लोणवाहीतील लोकांना नाहक त्रास सहन करावे लागतो आहे.
विदयुत विभागाने त्वरित नवीन dp चे आयोजन करावे अन्यथा लोणवाही वाशीय जनता आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही अशी प्रतिक्रिया लोणवाही वाशीय जनतेकडून होत आहे.






