श्री अमोल निनावे
संपाद्क:-झुंज सत्याची
मो. नं. 9764271316
सिंदेवाही :-सिंदेवाही तालुक्यातील सर्वोदय कन्या शाळा येथे आज दिनांक 25/07/2026 रोज शनिवारला मा.वनपरिक्षेत्र अधिकारी सामाजिक वनिकरण सिंदेवाही यांच्या मार्गदर्शनात सामाजिक वनीकरण परिक्षेत्र सिंदेवाही तर्फे वनमहोत्सव कार्यक्रमाअंतर्गत सर्वोदय कन्या कनिष्ठ महाविद्यालय सिंदेवाही येथे शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. सदर कार्यक्रमाला शाळेच्या प्राचार्या श्रीमती यादव मॅडम, श्री.बनकर सर, श्री कावळे सर तसेच समस्त शिक्षकवृंद व विध्यर्थी बहुसंख्येने उपस्तिथ होते. तसेच सामाजिक वनीकरण अधिकारी मा.श्री. ए.ए. दंडेवार वनपरिक्षेत्र अधिकारी सामाजिक वनीकरण परिक्षेत्र सिंदेवाही, श्री.के.पी.येनुरकर वनपाल, श्री.एस.डब्ल्यू.बोनलवार वनरक्षक ,श्री.अमोल निनावे सामाजिक युवा ब्रिगेड संस्थाचे अध्यक्ष्य व शिक्षक व शाळेच्या विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.यावेळी बोनलवार यांनी विधार्थ्याना झाडे आपण लावली मात्र त्याची जोपासना पण कशी करावे या बद्दल मार्गदर्शन केले.






