⏹️ तालुका विधी समिती सावली
श्री अमोल निनावे
संपाद्क :-झुंज सत्याची
मो. नं. 9764271316
सावली :- मा. राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशान्वये आणि NALSA च्या किमान समान कार्यक्रमांतर्गत तळागाळातील नागरिकांपर्यंत व विद्यार्थ्यांपर्यंत कायद्याचे ज्ञान पोहोचावे या उद्देशाने एका विशेष कायदेविषयक जनजागृतीपर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबीर ‘तालुका विधी सेवा समिती, सावली’, ‘तालुका वकील संघ, सावली’ आणि ‘जागृती समिती’ यांच्या संयुक्त विद्यमाने,जि. प. उ. श्रेणी प्राथमिक शाळा, मौजा चक पिरंजी, ग्रामपंचायत चक पिरंजी, ता. सावली येथे आयोजित करण्यात आले होते.
या शिबिराच्या अध्यक्षस्थानी मा.श्री ए. ए. चव्हाण, अध्यक्ष, तालुका विधी सेवा समिती उपस्थित होते. तसेच, प्रमुख अतिथी आणि मार्गदर्शक म्हणून तालुका वकील संघाचे ॲड. श्री बी. टी. लाडे, ॲड. ए. एन. गेडाम, सावली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्री जितेंद्र तिजारे, श्री कोमलवार, गट विकास अधिकारी आणि विधी स्वयंसेवक श्री शडाकांत कवठे, श्री पुरूषाेत्तम बोरकुटे उपस्थित होते. यासोबतच शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, विद्यार्थी, सरपंच व चक पिरंजी येथील बहुसंख्य ग्रामस्थ या कार्यक्रमाला उपस्थित होते.







