पोलीस अधीक्षक श्री आयुष् नोपानी यांच्यामुळे अवैध धंदेवाल्यांचे चांगलेच धाबे दणाणले
श्री अमोल निनावे
संपाद्क:-झुंज सत्याची
मो. नं. 9764271316
चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी तसेच अवैध व्यवसायात वाढ झालेली होती. मात्र नुकतेच नव्याने रुजू झालेले कर्त्यव्यदक्ष, व दबंग अधिकारी म्हणून ज्यांची दहशत आहे असे पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांची बद्ली चंद्रपूर पोलीस अधीक्षक म्हणून झाली. तेव्हापासून अवैध धंदे वाल्यांचे चांगले धाबे दणाणले आहेत.
रोज चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात मोठ्या प्रमाणात गुन्हेगार लोकांना पकडून अवैध वेवसाय करणाऱ्या लोकांना चान्गलाच धडा शिकविण्याचे काम सुरु आहे.
पोलीस अधीक्षक यांनी जिल्ह्यातील जेवढेही सराईत गुन्हेगार होते त्या सर्वाना बोलवून चांगलीच परेड घेतली तसेच जे अटळ गुन्हेगार आहेत अश्यावरती प्रतिबंधक कार्रवाही सुद्धा करण्यात आले. अधिक गुन्हे केल्यास तडीपार करण्याची कार्रवाही करतील अशी सुद्धा माहिती देण्यात आली.
त्यामुळे आता चंद्रपूर जिल्ह्यात गुन्हे कमी होऊन शांतिमय वातावरण निर्माण होणार हे तेवढेच सत्य असल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील लोकांमध्ये खुशीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशीच कार्रवाही शेवट पर्यंत करावे अशी मागणी लोकांकडून होत आहे.






