श्री अमोल निनावे
संपाद्क:-झुंज सत्याची
मो. नं. 9764271316
सिंदेवाही मधील अमूल्य ट्युशन क्लासेसचे शिक्षक श्री अमोल सेवादास निनावे यांनी ट्युशन मध्ये असलेल्या वर्ग 6वी 7वी 8वी , तसेच 9विच्या मुलांना शाळेत मधून जे टॉपर आहेत अश्याना, शैक्षणिक जीवनात ऊर्जा मिळावी म्हणून छोटीशी भेट वस्तूच्या स्वरूपात पाहुण्यांच्या हातून बक्षीस वितरण केले.
तसेच वर्ग 10 वी मध्ये असलेल्या अमूल्य ट्युशन क्लासेसच्या मुलींना मार्गदर्शन करण्याकरिता सिंदेवाही पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सौ. भोंडवे मॅडम तसेच जेष्ठ शिक्षक श्री बिरेवार सर, पाकेवार सर तसेच मुरमाडीचे सरपंच रत्नावार मॅडम यांना बोलविण्यात आले होते.
मुलांना मार्गदर्शन करताना बिरेवार सर यांनी अभ्यास कसा करायचा याबद्दल ट्रिक सांगितले. तर सहाय्यक पोलीस निरीक्षक सौ भोंडवे मॅडम यांनी आपल्या परिस्थितीची जाणीव करून दिले. व तुम्ही सुद्धा आमच्या सारखे गरीब कुंटूंबातून मोठे व्हावे आणि छान अभ्यास करून आई वडिलांचे नाव कमवावे असे सांगितले. कार्यक्रमातच 5 मिनिटांमध्ये मॅडम छान कविता लिहिले आणि त्यांना मार्गदर्शनांतून ऐकविले.
सर्वानी छान शांतपणाने कार्यक्रम पार पाडण्यास मदत केले.या कार्यक्रमामुळे मुलांमध्ये नवचैतन्य निर्माण होऊन नक्कीच त्याची प्रगती कडे वाटचाल होणार हे निश्चित.
देवयानी इंटरनॅशन स्कूलचा आठवीतील तक्ष साखरे, सीताबाई शेंडे शाळेचे 9 वीचे स्वरा गिरडकर व मीनाक्षी मेश्राम आणि लोकसेवा मिडस्कूल चा मनोमय पाकेवार अश्या 5 विध्यर्थंना पाहुण्याच्या हातून बक्षीस देण्यात आले. त्यामुळे त्यांना आणखी समोर अभ्यास करण्याची आवड निर्माण होऊन 10 वी मध्ये सर्वात जास्त गुणाने कसे टॉपर राहता येणार याकडे लक्ष्य वेधलेले आहे.





