अमूल्य ट्युशन क्लास मध्ये 4 थी ते 10 वी पर्यंत घेतले होते शिक्षणाचे धडे
श्री अमोल निनावे
संपाद्क:-झुंज सत्याची
मो. नं. 9764271316 सिंदेवाही :-गुंजेवाही येथील करणं चामेवार(प्रणय नरेश चामेवार यांनी शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द जर मनात असेल, तर कोणतीही अडचण यशाचा मार्ग रोखू शकत नाही हे पोलीस बनून शक्य करून दाखविले आहे. आई-वडिलांचे छत्र हरवल्यानंतरही, परिस्थितीवर मात करत गुंजेवाही येतील मंगेश गाडलेवार या घरी राहून मामांच्या भक्कम पाठिंब्याच्या जोरावर करण चामेवार याने महाराष्ट्र पोलीस दलात निवड होऊन आपल्या स्वप्नांना गवसणी घातली आहे.
मामांची साथ आणि संघर्षाचा प्रवास करणचा प्रवास हा अत्यंत संघर्षाचा राहिला आहे. घरची परिस्थिती हलाखीची असतानाच आई-वडिलांचे निधन झाले, ज्यामुळे कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला होता. अशा कठीण प्रसंगात त्याच्या मामांनी त्याला मोलाची साथ दिली. मामांनी दाखवलेला विश्वास आणि वेळोवेळी केलेले मार्गदर्शन यामुळेच करणला या संकटातून बाहेर पडून ध्येयावर लक्ष केंद्रित करता आले. मामांच्या कष्टाला आणि विश्वासाला करणने आपल्या कर्तृत्वाने आज खऱ्या अर्थाने न्याय दिला आहे.
जिद्द आणि मेहनतीचे फळ
पोलीस भरतीसाठी आवश्यक असणारी कठोर शारीरिक मेहनत आणि अभ्यासातील चिकाटी करणने शेवटपर्यंत टिकवून ठेवली. अनाथपणाचे दुःख बाजूला सारून त्याने केवळ खाकी वर्दी मिळवण्याचे ध्येय समोर ठेवले होते. अखेर त्याच्या या कष्टाचे चीज झाले असून, त्याची महाराष्ट्र पोलीस पदी निवड झाली आहे.
गावात आनंदाचे वातावरण
करणच्या या यशामुळे केवळ त्याचे कुटुंबच नव्हे, तर संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण आहे. “आई-वडिलांची उणीव मामांनी भासू दिली नाही आणि त्यांच्याच प्रयत्नांमुळे आज मी पोलीस झालो,” अशा शब्दांत करणने आपल्या भावना व्यक्त केल्या. एका गरीब कुटुंबातील मुलाने प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मिळवलेले हे यश समाजातील इतर तरुणांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल.
करण चामेवार याच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्याचे आणि त्याला खंबीर साथ देणाऱ्या त्याच्या मामांचे कौतुक होत आहे.त्यांचे शिक्षण भारत शाळा नवरगाव इथे झाले असून त्याची ट्युशन कलासेस नवरगाव मधील अमूल्य ट्युशन येथील शिक्षक श्री अमोल सेवादास निनावे यांचे कडे होते. समोरील वाटचाली करिता चामेवर कुटुंब, शिक्षक वृंद यांनी शुभेच्छा दिल्या.





