श्री अमोल निनावे
संपाद्क:-झुंज सत्याची
मो.नं. 9764271316
सिंदेवाही :-सिंदेवाही तालुक्यातील अवैध धंदेला आळा घालण्याकरिता अनेक पत्रकार आपल्या जीवाची बाजी लावून अवैध सुरु असलेल्या बातम्या छापण्याचा पर्यंत करीत असतात मात्र त्याच बातम्या मुळे केव्हा केव्हा पत्रकार लोकांनाच अनेक समश्याचा सामना करावा लागतो. अशीच घटना सिंदेवाही तालुक्यात मिथुन मेश्राम यु ट्यूब चॅनल चे पत्रकार यांच्या सोबत घडली.तालुक्यात अवैध वाळू तस्करीचे जाळे किती खोलवर पसरले आहे, याचा प्रत्यय देणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अवैध वाळू उपशाविरोधात आवाज उठवणारे न्यूज रिपोर्टर मिथुन मेश्राम यांनाच फसवण्याचा प्रयत्न वाळू तस्करांकडून करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, मिथुन मेश्राम हे वाळू तस्करीच्या विरोधात बातमी लावणार होते. याचा राग मनात धरून आणि त्यांना अडकवण्याच्या उद्देशाने, तस्करांनी एक कुटील डाव रचला. मेश्राम यांच्या मालकीच्या रिकाम्या जागेवर तस्करांनी अवैध रित्या वाळू आणून साठवली. यामागे मिथुन मेश्राम यांना कायदेशीर कचाट्यात पकडण्याचा हेतू असल्याचे प्राथमिक दृष्ट्या दिसून येत आहे.
सिंदेवाही पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद तसेच समोरील कार्रवाही सुरु
या प्रकरणी सिंदेवाही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तातडीने चौकशी सुरू केली आहे. एका पत्रकाराला अशा प्रकारे लक्ष्य केले गेल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
महत्त्वाचा प्रश्न: पोलीस प्रशासनाने तर कारवाई सुरू केली आहे, मात्र आता सिंदेवाही महसूल विभाग या अवैध वाळू साठ्याबाबत आणि तस्करांवर कठोर कार्यवाही करणार का? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
अवैध रेती तस्करी करणाऱ्या लोकांनी कारस्थान रचून पत्रकाराच्या स्वतःच्या जागेवर विनापरवाना वाळू साठवून त्यांना फसवण्याचा प्रयत्न केल्याने आता पत्रकार वरतीच जर अशी वेळ येत असेल तर पत्रकारांनी आपली निर्भीड पत्रकरिता करावी कशी असा विचार सिंदेवाही तालुक्यातील पत्रकार लोकांना पडलेला आहे. अखेर सिंदेवाही तालुक्यातील अवैध धंदे करणाऱ्या वरती आशीर्वाद कुणाचे आहे त्यामुळे हे एवढ्या मोठ्या प्रकार करून राहले असे प्रश्न आता लोकांच्या मनात पडून राहले आहे.
समोरील तपास सिंदेवाही पोलीस करीत असून सर्वांच्या नजरा नेमकी ती रेती कुणाची आणि कशासाठी तिथे आणून टाकली आहे या कडे लागली आहे. आणि या रेतीचा वालीच कोणी नसेल तर मग त्या रेतीचा शासन काय करणार ह्या कडे सर्वांचे लक्ष्य लागलेले आहे.





