थकीत कर धारकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत
श्री अमोल निनावे
संपाद्क;-झुंज सत्याची.
मो. नं. 9764271316
सिंदेवाही :- सिंदेवाही-लोनवाही नगरपंचायत क्षेत्रातील थकीत मालमत्ता कर वसुली मोहिमेस गती देण्यात आली असून, मा. डॉ. माधुरी सलामे, मुख्याधिकारी, सिंदेवाही-लोनवाही नगरपंचायत यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित करदात्यांविरुद्ध कठोर कार्यवाही करण्यात येत आहे.
या अनुषंगाने, दिनांक 24 मार्च, 2026 रोजी थकीत मालमत्ता कर न भरल्यामुळे व्यवसायिक मालमत्ता सिल करण्यात आली आहे. यावेळी कर विभाग प्रमुख श्री विजय किरवले, रचना सहाय्यक कु. शुभांगी मडावी, अभियंता मनोज आंबोरकर, नुतन कोरडे, लेखापाल सुरज गायकवाड, लिपिक टंकलेखक सुधाकर निकूरे, संजय रामटेके, पुरुषोत्तम खोब्रागडे, संजय वाकडे, सुधिर ठाकरे व सर्व कर्मचारी यांचे उपस्थितीत थकीत कराची वसुली यशस्वीरीत्या करण्यात येत असून दिनांक 30 मार्च 2026 पर्यंत थकित मालमत्ता कर व पाणी पट्टी कर न भरणा केल्यास दिनांक 31 मार्च, 2026 रोजी मालमत्ता सिल व नळ कनेक्शन बंद करण्याची कार्यवाई करण्यात येईल याबाबत थकीत मालमत्ता कर व पाणी कर धारकांना नोटीस बजावण्यात आले आहे.
नगरपंचायत प्रशासनामार्फत सुरू असलेल्या या विशेष वसुली मोहिमेत कर न भरलेल्या मालमत्तांवर नियमांनुसार कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी आपला थकीत मालमत्ता कर तात्काळ भरून प्रशासनास सहकार्य करावेB, असे डॉ. माधुरी सलामे, मुख्याधिकरी, सिंदेवाही-लोनवाही नगरपंचायत यांनी नगरप्रशासन वतीने आवाहन करण्यात येत आहे.त्यामुळे कर थकदाराचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.






