जिद्द आणि चिकाटीचा विजय!
श्री अमोल निनावे
संपाद्क:-झुंज सत्याची
मो. नं. 9764271316
नवरगाव :-अत्यन्त गरीब परिस्थीती मध्ये असलेला नवरगावच्या मातीतील एक हिरा आज डॉक्टर झाला! उमरवाही सारख्या छोट्याशा ग्रामीण भागात, अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत राहून थामुनी भाऊराव मडावी हा लहान पनापासूनच आपल्या आई सोबत राहायचा, वडिलांचा कोणताही आधार नसलेला थामुनी याने आपल्या आई आणि मामाच्या सानिध्यातून नवरगावच्या लोकसेवा हायस्कूल मध्ये शिक्षण घेतले व त्याच शाळेच्या होस्टेल मध्ये राहत असायचा.
अतिशय हुशार तसेच शांत स्वभाव असलेला थामुनी याने आपले ट्युशन क्लास श्री अमोल निनावे (अमूल्य ट्युशन क्लासेस)यांच्या कडे लावले होते.होस्टेलचे मुले म्हटलं कि केवळ सुट्या मारायचे मात्र थामुनी याने कधीहि सुट्या नं मारता केवळ आणि केवळ अभ्यास करण्याकरिता तो होस्टेल वरतीच थांबायचं व ट्युशन ला हजर राहायचा.
🎓 शैक्षणिक प्रवास:
इ. ५ वी ते १० वी: लोकसेवा हायस्कूल, नवरगाव.
११ वी व १२ वी: नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालय, ब्रम्हपुरी.
MBBS: मुंबईचे नामांकित के.ई.एम. (KEM) वैद्यकीय महाविद्यालय.
काल १६ मार्च रोजी थामुनीला वैद्यकीय पदवी (MBBS) प्रदान करण्यात आली. गरिबीवर मात करत त्याने घेतलेली ही गरुडझेप आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे. लोकसेवा हायस्कूल आणि संपूर्ण नवरगाव परिसरासाठी ही आनंदाची आणि अभिनंदनाची बाब असून
डॉ. थामुनी मडावी, चे चहू बाजूने अभिनंदनाचे वर्षाव होत आहे.






