चंद्रपूर जिल्ह्यात ओबीसी प्रवर्गात 4 क्रमांक
श्री अमोल निनावे
संपाद्क :-झुंज सत्याची
मो. नं. 9764271316
सिंदेवाही : शहरातील प्राजक्ता विद्या मंदिर, सिंदेवाही येथील इयत्ता पाचवीत शिक्षण घेणारा अंशुमन महेश कोल्हे (रा. सिंदेवाही) याने नवोदय प्रवेश परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या निकालानुसार अंशुमनने चंद्रपूर जिल्ह्यातील ओबीसी प्रवर्गातून चौथा क्रमांक पटकावला आहे. अंशुमनच्या या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. आपल्या यशाचे श्रेय त्याने आई-वडील, शाळेतील शिक्षक तसेच मार्गदर्शक लोकेश गोपाले यांना दिले आहे. कठोर परिश्रम, सातत्य आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर अंशुमनने हे यश मिळवले असून इतर विद्यार्थ्यांसाठी तो प्रेरणादायी ठरत आहे.






