श्री अमोल निनावे
संपाद्क:-झुंज सत्याची
मो. नं. 9764271316
सिंदेवाही तालुक्यातील मुरमाडी या छोट्याश्या गावात सावित्रीबाई फुले ग्रामसंघाच्या पुढाकाराने जागतिक महिला दिनानिमित्य विविध स्पर्धा, मार्गदर्शन आणि सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पाडले .
कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणुन मालतीताई सगणे निमंत्रक महिला राजसत्ता आंदोलन मुंबई या उपस्थित होत्या तर उदघाटक म्हणुन सौं राणी भोंडवे ए. पी. आय. पो. स्टे.सिंदेवाही या उपस्थित होत्या. प्रमुख अतिथी म्हणुन सौं विद्या बन्सोड विधी निदेशक मूल,ममता शेंडे समुपदेशक मूल,सुनीता मेश्राम महिला उधोजक रत्नापूर,रुपाली रत्नावार प्रशासक मुरमाडी, राजश्री वसाके केंद्रप्रमुख,शीतल मसराम अध्यक्ष शा. व्य स.सोनाली पेंदाम सरपंच गडमौशी उपस्तिथ होते. सर्व पाहुणे मंडळींनी महिलांना आर्थिक, आरोग्य, उद्योग आणि कायदे विषयक बाबीवर उत्तम मार्गदर्शन केले.
सांस्कृतिक कार्यक्रमाला उदघाटक म्हणुन माजी उपसभापती वीरेंद्र जयस्वाल तर अध्यक्ष म्हणुन व्यवस्थापक जयेंद्र सोनवाने उपस्थित होते.प्रमुख पाहुणे म्हणुन सचिन नाडेमवार, रमेश मेश्राम मु अ, प्रकाश बन्सोड स. शिक्षक, नंदू मोहुर्ले, पो. पा, यादवजी ढोक अध्यक्ष त. मु. स, अनिलजी दुर्गे अध्यक्ष व.समिती,वैभव रत्नावार,प्रवीण खाडिलकर ऑपरेटर तसेच गावातील बहुसंख्य मान्यवर मंडळी उपस्थित होते.
कार्यक्रम प्रसंगी मुरमाडीच्या माजी सरपंच रुपालीताई रत्नावार यांचा ग्रामसंघाच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. महिलांसाठी सामान्य ज्ञान, फॅशन शो,संगीत खुर्ची,कबड्डी सारख्या स्पर्धा घेऊन त्यांचे बक्षीस वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामसंघाच्या अध्यक्ष रेखा ढोक, सचिव करुणा मसराम, कोषाध्यक्ष शीतल मसराम, आय. सी. आर. पी. सीमा दुर्गे, पशुसखी अरुणा नन्नावरे आणि समाविष्ट सर्व महिला समूह अध्यक्ष, सचिव आणि सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.
मुरमाडी सारख्या छोटयाशा गावात महिलांनी स्वतः घडवून आणलेला हा कार्यक्रम स्तुतनीय असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.






