जामा मस्जिदमध्ये उत्साहात इफ्तार पार्टी संपन्न
श्री अमोल निनावे
संपाद्क:-झुंज सत्याची
मो. नं. 9764271316
सिंदेवाही:-सिंदेवाही मध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत रोजेदारांनी सोडला रोजा.
पवित्र रमजान महिन्यानिमित्त सिंदेवाही येथील जामा मस्जिदमध्ये जयस्वाल परिवारातर्फे आयोजित करण्यात आलेली भव्य इफ्तार पार्टी उत्साहात संपन्न झाली. मागील तब्बल ३५ वर्षांपासून सर्वधर्मीय ऐक्याचा संदेश देणारी ही परंपरा अविरतपणे सुरू असून यंदाही अरविंदभाऊ (मुन्ना) जयस्वाल यांच्या पुढाकारातून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सूर्यास्तानंतर अजान झाल्यानंतर रोजेदारांनी खजूर व पाण्याने रोजा सोडत इफ्तार केला. त्यानंतर उपस्थितांसाठी विशेष भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी रमजान महिन्याचे महत्त्व सांगत समाजात शांतता, बंधुभाव आणि ऐक्य टिकवण्याचे आवाहन केले.
यावेळी जयस्वाल परिवारातर्फे मुस्लिम समाज बांधवांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला जामा मस्जिद कमिटीचे अध्यक्ष अमान कुरेशी, सचिव युनूस शेख, सहसचिव समीर पठाण, उपाध्यक्ष अशपाक शेख, मेम्बर सहजाद पठाण, सम्मी कुरेशी, सलमान पठाण, साहिल शेख, वाजीद कुरेशी, तय्यब शेख, कदीर शेख, राहील शेख तसेच डॉ. चिंतावार साहेब, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, समाज बांधव आणि पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला असून जयस्वाल परिवाराच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.






