श्री अमोल निनावे
संपाद्क:-झुंज सत्याची
मो. नं. 9764271316
सिंदेवाही येथील साई नगर परिसरात बिबट्याचा वावर असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दिनांक 2/3/2026 रोज सोमवारला साधारण १.३० वाजताच्या सुमारास मस्जिदमधून घरी परताना पत्रकार अमान कुरेशी यांना बिसेन यांच्या घरासमोर अचानक भररस्त्यावर्ती बिबट्या दिसला.अचानक समोर आलेल्या बिबट्यामुळे काही क्षण परिस्थिती तणावपूर्ण झाली. बिबट्या हळूहळू त्यांच्या दिशेने येत असल्याचे लक्षात येताच त्यांनी तत्काळ आरडाओरड सुरू केली. त्यांच्या आवाजामुळे बिबट्या सिंधु भवन रोडच्या दिशेने वळला व तेथे काही वेळ थांबून निघून गेला.
प्रसंगावधान राखत अमान कुरेशी यांनी तातडीने दुचाकी घराजवळ आणून सुरक्षितपणे आत प्रवेश केला व नगर सेवक युनूस शेख यांना फोन करून माहिती दिली. त्यानंतर दोघांनी टॉर्चच्या सहाय्याने परिसरात शोध घेतला; मात्र बिबट्या सिंधु भवनकडे निघून गेल्याचे आढळले.
या घटनेमुळे साई नगर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी विशेषतः रात्रीच्या वेळी एकटे बाहेर पडू नये, लहान मुलांवर लक्ष ठेवावे तसेच वनविभागाला तत्काळ माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
साई नगरातील सर्व मित्र, भाऊ-बहिणींनी सतर्क राहावे व कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास त्वरित वन विभागाला कळवावे.
अमन कुरेशी यांच्या वरती “काळ आला पण वेळ आली नव्हती “अशी प्रचिती आज झाली असे म्हणाला काही हरकत नाही.






