काही राजकीय लोकांचे ट्रॅक्टर सामील
श्री अमोल निनावे
संपाद्क:-झुंज सत्याची
मो. नं. 9764271316
सिंदेवाही तालुक्यात मोठ्या प्रमाणात रेती तसेच मुरुमचे अवैध धंदे सुरु आहे मात्र याकडे सिंदेवाही तालुक्यातील महसूल प्रशाशनाचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष्य होत होते.
त्यामुळे हि बाब उपविभागीय दंडाधिकारी चिमूर यांच्या लक्षात येताच त्यांनी काल रात्रौला दिनांक 20/2/2026 रोज शुक्रवारला सिंदेवाही येथील अवैध रित्या सुरु असणाऱ्या रेती चोरीला आळा घालण्याकरिता बंदोबस्त लावला असता त्याच रात्री एकूण 5 ट्रॅक्टर रेती चोरी करताना आढळून आल्याने त्या पाच हि ट्रॅक्टरला पकडून सिंदेवाही तहसीलच्या दालनात लावण्यात आले. त्यामुळे सिंदेवाही तालुक्यातील अवैध वाहतूक करणाऱ्या लोकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
यात काही राजकीय लोकांचे ट्रॅक्टर असल्याने सर्वत्र खळबळ माजलेली आहे. त्यामुळे अशीच कार्रवाही सतत राहणार कि केवढं हि वर्षाकाठी दाखविण्यासाठी राहणार असे सुद्धा विचार आता लोकांच्या मनात पडू लागलेले आहे. मात्र एकाच रात्री एवढी मोठी कार्रवाही हि पहिलीच वेळ असल्याने अवैध धंदे वाल्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.






