श्री अमोल निनावे
संपाद्क:-झुंज सत्याची
मो. नं. 9764271316
सिंदेवाही – तालुक्यात कार्यरत असलेल्या सिंदेवाही तालुका पत्रकार संघाची नुकतीच नवीन कार्यकारिणी गठित करण्यात आली असून संघाच्या अध्यक्षपदी अमन कुरेशी तर सचिव म्हणून कुणाल उंदिरवाडे तर कोषाध्यक्ष म्हणून अमोल निनावे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली असल्याने सिंदेवाही तालुक्यातून त्यांचे सर्वच स्तरावरून अभिनंदन करण्यात येत आहे.
सिंदेवाही तालुका पत्रकार संघ हा तालुक्यात काम करीत असून तालुक्यातील समस्याग्रस्त नागरिकांचा आवाज बनून त्यांच्या आवाजाला पत्रकारितेच्या माध्यमातून प्रशासनापर्यंत पोहचविण्याचे काम करीत आहे. तालुका पत्रकार संघाच्या मागील कार्यकारिणीचा तीन वर्षाचा कालावधी लोटला असल्याने नुकतीच तालुका पत्रकार संघाच्या कार्यालयात बैठक आयोजित करून नवीन कार्यकारिणी गठित करण्यात आली. यामध्ये अध्यक्ष म्हणून अमन कुरेशी, उपाध्यक्ष जितेंद्र नागदेवते सचिव कुणाल उंदिरवाडे, सहसचिव अमोल बनसोड, कोषाध्यक्ष अमोल निनावे, तर सदस्य म्हणून लक्ष्मीकांत कामतवार, मिथुन मेश्राम, महेन्द्र कोवले, संदीप बांगडे, प्रवीण नागदेवते, विशांत लोखंडे, रोशन खानखुरे , धनराज सरपाते यांची निवड करण्यात आली. नवीन कार्यकारिणीला मावळत्या कार्यकारिणीकडून पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. सिंदेवाही तालुका पत्रकार संघाच्या वतीने नियोजित जागेवर एक नवीन सुसज्ज असे पत्रकार भवन निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत नवनियुक्त अध्यक्ष अमन कुरेशी यांनी व्यक्त केले आहे. सिंदेवाही तालुका पत्रकार संघाची नवीन कार्यकारिणी गठित झाली असल्याने त्यांचे सर्वच स्तरावरून अभिनंदन करण्यात येत आहे.






