चार दिवसापासून रुग्णाचे घेतलेले थुंकीची अजूनही चेकिंग आणि रिपोर्ट नाही
रक्त चाचणी करणारे डॉक्टर आपल्याच असतात धुंदीत
श्री अमोल निनावे.
संपाद्क:-झुंज सत्याची
मो. नं. 9764271316
सिंदेवाही मध्ये असलेल्या ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी अनेक सोयीसुविधा सरकारनी उपलब्ध करून दिलेल्या आहे. त्यामुळे अनेक खेड्यातील तसेच सिंदेवाही मधील रुग्ण आपले उपचार करण्याकरिता या ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही मध्ये येत असतात.
ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही इथे ब्लड चेक करणे, थुंकी चेक करणे तसेच x. Ray या सारख्या सुविधा आहे. त्यामुळे सर्वसाधारण रुग्ण याच रुग्णालयात आपले उपचार करायला येत असतात. मात्र त्या ठिकाणी अनेक सोईसुविधाचा अभाव आढळून येत आहे. जिथे ब्लड चेक केला जातो तिथले काही कर्मचारी हे डॉक्टरनी लिहून दिलेली स्लिप नं बघता केवढं रुग्णांचा रक्त काढतात आणि रिपोर्ट पूर्ण देण्याच्या ऐवजी दुसरीच रिपोर्ट देतात. असेच प्रकार या दोन दिवसा अगोदर एका रुग्ण सोबत झालेले आहे. तसेच 4 दिवसापासून त्या रुग्णाचे थुकीं घेऊन ठेवण्यात आले मात्र त्या थुकींची तपासणी पण झालेली नाही आणि त्याची रिपोर्ट पण दिलेली नाही त्यामुळे अश्या भोंगळ कारभारावर्ती केव्हा आळा बसणार असे सिंदेवाही तालुक्यातील लोकांचे मनोगत आहे. यावरती वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष्य देऊन रुग्णाची मदत करावे तसेच कर्मचारी यांना त्यांची नोकरीची जाणीव करून द्यावे अशी मागणी होत आहे.






