श्री अमोल निनावे
संपाद्क:-झुंज सत्याची
मो.नं. 9764271316
नगरपंचायत सिंदेवाही लोणवाहीच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून शहरात क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
या आयोजनात सिंदेवाही तालुक्यातील सर्व शासकीय टीम ज्या मध्ये कृषी विभाग, तहसील, पोलीस स्टेशन, वनविभाग, महावितरण,नगरपंचायत टीम, आयटीआय कॉलेज, सर्वोदय शाळा, सरकारी हॉस्पिटल कर्मचारी, पत्रकार संगठना आणि व्यापारी युनियन संगठना, यांना या कार्यक्रमात आमंत्रित केले होते त्यामुळे या सर्व टीमने आपले सर्व कर्मचारी निशी जिद्दीने उतरून या खेळात सहभागी होऊन विजय मिळविण्यात यशश्वी झाले.
सिंदेवाही पोलीस स्टेशन यांनी जिद्द व चिकाटीच्या भरोश्यावरती सर्वात जास्तीत जास्त गेम मध्ये विजय मिळवून नाव लौकिक केले. यात त्यांनी पुरुष रस्सीखेच, महिला रस्सीखेच, रनिंग पुरुष आणि महिला, तसेच महिला क्रिकेट या सर्व पाच ते सहा हि खेळामध्ये घवघवीत मेहनतीने प्रथम पारितोषिक प्राप्त केले त्यामुळे सिंदेवाही तालुक्यात चहू बाजूने सिंदेवाही पोलीस स्टेशनचे तसेच पोलीस निरीक्षक श्री कांचन पांडे यांचे अभिनंदन तसेच कौतुक करण्यात आले.
तसेच नगरपंचायत च्या कर्मचारी यांनी पुरुष क्रिकेट टीमने प्रथम पारितोषिक मारून विजय प्राप्त केले, आणि व्यापारी असोसिएशन संगठना यांनी व्हॉलीबॉल खेळात प्रथम पारितोषिक प्राप्त केले त्यामुळे या सर्व टीमचे सिंदेवाही तालुकातुन अभिनंदन करण्यात आले.
या विजयी टीमला बक्षीस वितरण करण्याकरिता माजी मंत्री तथा आमदार व लोक लेखा समितीचे अध्यक्ष्य श्री विजय वड्डेट्टीवार, नगराध्यक्ष भाष्कर नन्नावार यांच्या हस्ते विजेता संघाला चषक व पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. तसेच नगरपंचायतचे सर्व पदाधिकारी व सदश्य आणि कर्मचारी यांनी दर वर्षी हे कार्यक्रम आयोजन केल्यामुळे सर्व टीमने तसेच या खेळात सहभागी असलेल्या टीमने नगरपंचायतचे आभार मानले.





