श्री अमोल निनावे
संपाद्क:-झुंज सत्याची
मो. नं. 9764271316
सिंदेवाही येथील जैस्वाल पेट्रोल पम्पच्या मागे काही वर्षांपूर्वी नीलकंठ वेलादी यांचे NATP प्लॉट पडले होते. तेव्हा श्रीकुष्ण पांडूरग गंजेवार यांनी सन 2025 मध्ये नीलकंठ वेलादी यांच्याकडून गट क्र. 282 प्लॉट नं 6 हा अधिकृत रजिस्ट्री करून घेतला आणि त्यानंतर त्यांनी त्या प्लॉट वरती बांधकाम करायचा आहे म्हणून आज दिनांक 9/2/2026 ला ठीक दुपारला 3 वाजताच्या दरम्यान खाजगी ट्रॅक्टरच्या साहाय्याने प्लॉट साफ करण्यास सुरुवात केला असता. सिंदेवाहीचे किशोर भरडकर हे त्या ठिकाणी आले व त्यांना शिवागीळ करून हि जागा माझी आहे तू आपले काम बंद कर म्हणून हाणामारी करू लागले तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याने श्रीकृष्ण गंजेवार रा. वाढोणा यांनी लगेच पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली असता सिंदेवाही पोलिसांनी चौकशी करून किशोर भरडकर वरती अपराध क्रमांक भारतीय न्याय सहीता (बी एन एस )2023, 296 कलम, 115(2), 351(2) कलम अतंर्गत कार्रवाही केली.समोरील तपास सिंदेवाही पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री कांचन पांडे साहेब यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक श्री श्रीकांत लांजेवार सर करीत आहेत.





