श्री अमोल निनावे
संपाद्क:-झुंज सत्याची
मो. नं. 9764271316
सिंदेवाही शहरात मोठ्या प्रमाणात खाजगी शाळा निर्माण झाल्या असून प्रत्येक पालकांना वाटतो कि माझा मुलगा एका खाजगी शाळेत शिकून नाव मोठा करेल म्हणून दर महिन्याला मोठी फी देऊन पालक हे मुलांना खाजगी शाळेत ऍडमिशन घेत असतात. मात्र जे शासन मान्य शाळा आहे अश्या शाळेत शिक्षण चांगले मिळून सुद्धा पालक वर्ग त्या शाळेत मुलांना टाकताना दिसत नाही.
प्रत्येक पालकांना वाटत असते कि मुलांचे भवित्यव्य सुधारावे, त्यामुळे गरिबातील गरीब वेक्ती सुद्धा मोलमजुरी करून महिन्याकाठी 500 ते 1000 रु खर्च करून CBSE पॅर्टनच्या शाळेत टाकत असतात. मात्र एवढे पैसे खर्च होऊन सुद्धा त्या मुलांना काहीच येत नाही म्हणून तिथल्याच शाळेतील शिक्षक मुलांना ट्युशन क्लास आपल्याच कडे लावायला लावत असल्याने गोरगरीब पालकांच्या मुलांना खरच प्रश्न उपस्तिथ निर्माण झालेले आहे.त्यांना शाळेत सुद्धा पैसे देऊन शिकवायला पाठवावे लागत आहे आणि त्याच शाळेतील शिक्षकाकडे पैसे देऊन ट्युशन लावावे लागत असल्याने डबल पैसे मोजून देण्याची वेळ आली असल्याने काही पालक वर्ग हतबल झालेला आहे.
या वरून अस लक्ष्यात येते कि मुलांना केवढं शिक्षण कमी आणि पैसेचा बाजार मोठ्या प्रमाणात होत असून हा बाजार खाजगी शाळेतील लवकरात लवकर बंद व्हावे अशी मागणी सिंदेवाहीतील पालकांकडून होत आहे. यावर वरिष्ठ अधिकारी यांनी प्रत्येक खाजगी शाळेत भेट देऊन त्यांनी शिक्षनाबद्दल दर्जा आणि त्याच शाळेतील शिक्षक मुलांना खाजगी कोचिंग क्लासेसला बोलवत असतील तर अश्यावरती कारवाही करावे अशी मागणी होत आहे.





