नाबालिक मुलांच्या हातात ट्रॅक्टरचे स्टेरिंग दिल्याने होत आहे मोठ्या प्रमाणात अपघात
सिंदेवाहीत अवैध मुरूम उत्तखनन व रेती चोरीला केव्हा बसणार आळा
वरिष्ठ अधिकारी यात सहभागी असल्याची गावात चर्चा
श्री अमोल निनावे
संपाद्क:-झुंज सत्याची
मो. नं. 9764271316
सिंदेवाही:-सिंदेवाही येथील सार्वजनिक बांधकाम कार्यालया जवळ काल दिनांक ०३/०२/२६ रोजी सकाळी १०-५० वाजता एका ट्रॅक्टरने गुराखी श्री मनोज भिवाजी रेपकावार वय 45 राहणार मदनापूर वॉर्ड सिंदेवाही याला ट्रॅक्टरने जब्बर धडक दिल्याने रेपकवार गंभीर जखमी झाले असून प्रकृती अतिशय चिंताजनक आहे.
ट्रॅक्टरमधे अवैध मुरुम भरून वाहतुक करित असतांना अपघात झालेला आहे.
सिंदेवाही तालुक्यात मुरुम उत्खनन व वाहतूक करण्यासाठी सिंदेवाही महसूल विभागाने दिनांक ०३/०२/२६ रोजी सिंदेवाही तालुक्यात कुणालाही परवाना दिला नसतांना सिंदेवाही येथील तहसील कार्यालया समोरून अवैध मुरम वाहतुक सुरू होता, अवैध मुरम वाहतुक असल्याने ट्रॅक्टर भरधाव वेगाने जात होता त्यामुळे अपघात झाल्याची चर्चा आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
रेपकवार हे अतिशय गंभीर जखमी असल्याने त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे प्रथमोपचार करून चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना नागपूर येथे उपचारासाठी पाठविण्यात आले आहे, सध्या त्यांच्यावर शर्थीचे उपचार सुरू आहे.
ट्रॅक्टरचे इंजिन व ट्रालीवर नंबर प्लेट नसल्याने गाडी क्रमांक कुठेही लिहीलेला नव्हता, त्यामुळे गाडी मालकाचे व चालकाचे नाव कळु शकले नाही.
सिंदेवाही मध्ये सरस प्रमाणात अवैध वाहतूक सुरु आहे मात्र याकडे जाणीवपूर्वक अधिकारी वर्ग दुर्लक्ष्य करताना आढळून येत आहे. ज्यांनी रेती चोरीची माहिती दिली त्याच वेक्तीची माहिती अधिकारी डायरेक्ट रेती चोरी करणाऱ्या मालकाला देत असल्यामुळे कोणीही गुपित माहिती द्यायला समोर होताना दिसत नाही.
सर्वांचे लक्ष आता ट्रॅक्टर मालक आणि चालकाकडे लागले असून यावर पोलीस प्रशाषण आणि महसूल विभाग कोणती कारवाही करतो याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहे.





