तहसीलच्या भिंतीला लागून तसेच ये जा करणारा मुख्य रस्त्याच्या बाजूलाच मृत कोंबड्या फेकल्याने परिसरात भीतीचे वातावरण
झुंज सत्याची
संपाद्क:-अमोल निनावे
मो. नं. 9764271316
सिंदेवाही लोणवाही परिसरातील तहसीलच्या भिंतींच्या बाजूला आठ दिवसा पासून संशयितरित्या दोन भरलेले दोन प्लॅस्टिकच्या पोतुल्या आढळून आले. त्यामुळे लोणवाही परिसरात दुर्गन्धी पसरलेली होती, त्यामुळे सकाळी लोणवहीच्या लोकांना खूपच वाईट वास येत असल्यानेत्यांना कुणाचा घातपात तर नाही झाला अशी भीती वाटल्याने त्यांनी लगेच माहिती सिंदेवाही पोलीस स्टेशनला तसेच नगरपंचायतचे अध्यक्ष्य यांना दिली. सिंदेवाही पोलिसांनी तसेच नगरपंचायतने तात्काळ आपले कर्मचारी त्या ठिकाणी पाठवून चौकशी केले असत्या त्या पोतुली मध्ये मृत कोंबड्या मोठ्या प्रमाणात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली.
गावात असे प्रकार होणे हे निदनीय बाब असून ज्या वेक्तीने हे कृत्य केले अश्या वेक्ती वरती कार्रवाही करण्याची मागणी लोणवाही वाशीय जनता तसेच तहसीलच्या कर्मचारी यांनी केली आहे. लोणवाही मध्ये एका इसमाचे गावातच पोल्टी फॉर्म असून काही दिवसा अगोदर कोंबड्यावरती मरि आल्याने अनेक कोंबड्या त्या ठिकाणी मृत झालेल्या होत्या त्यामुळे सदर इसमाने त्या कोंबड्या पोतुली मध्ये भरून गावाच्या बाहेर टाकायला पाहिजे होते मात्र त्यांनी तसे नं करता भर रस्त्याच्या बाजूला तसेच तहसीलच्या भिंतीला लागून टाकल्याने लोकांच्या मनात रोष वेक्त होत आहे. त्यामुळे या कडे आवर्जून पोलीस प्रशाशनाने तसेच नगरपंचायतने कारवाही करावी जेणे करून दुसऱ्यांदा हे कृत्य करायला त्याला विचार पडेल अशी मागणी लोणवाही वाशीय जनतेची आहे.






