श्री अमोल निनावे
संपाद्क:-झुंज सत्याची
मो. नं. 9764271316
चंद्रपूर :-शासनाने एक नवीन GR काढला असून त्यात शिक्षणाधिकारी (प्राथमिक )यांच्या कार्यालय जिल्हा परिषद, चंद्रपूर यांनी एक अध्यादेश प्रत्येक तालुक्यातील पंच्यायत समितीला सेवा निवृत्त असणारे जे शिक्षक असतील त्यांना कंत्राटी शिक्षक मानधन पदभार देण्याचे आदेश दिलेले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेवर रिक्त असणाऱ्या व अंत्यत आवश्यक असणाऱ्या पदांवर, पवित्र प्रणालीमार्फत नियमित शिक्षक भरतीमधून शिक्षक उपलब्ध होईपर्यंत किंवा शाळेचे सत्र संपेपर्यत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळातील व खाजगी शिक्षण संस्थांच्या अनुदानित शाळातील सेवानिवृत्त शिक्षकांमधून कंत्रटी तत्वावर शासन पत्रक दिनांक 07/07/2023 अन्व्ये कंत्रटी स्वरूपात प्रति महिना 20, 000 या प्रमाणे सेवानिवृत्त शिक्षकांपैकी शिक्षक भरण्याकरिता शिक्षण स्तरावरून निर्देश दिलेले आहे.
या मुळे जे सुशीक्षीत विध्यार्थी आहे ज्यांनी dted, B. Ad असे exam पास केलेले आहे त्यांना शिक्षण विभागाने केराची टोपली हातात दिली आहे. त्यामुळे युवा पिढीचे खूप मोठे नुकशान होत असल्याने कमालीची नाराजी पसरलेली आहे.






