तालुका पत्रकार संघाचे सदश्य कपिल मेश्राम यांनी 42 वेळा केले रक्तदान.
श्री अमोल निनावे
संपाद्क :-झुंज सत्याची
मो. नं. 9764271316
पोलीस स्टेशन सिंदेवाही जिल्हा चंदपूर येथे आज दिनांक 7/1/2026 रोजी वर्धापन दिनानिमित्य भव्य रक्तदान शिबीर राबविण्यात आले. सदर रक्तदान करण्याकरिता पोलीस स्टेशन परिसरातील सर्व जनता, पत्रकार संघ, व्यापारी संघ, पोलीस पाटील संघ, पोलीस कर्मचारी तसेच नवयुवक मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्तिथ होते.
या रक्तदान शिबीर मध्ये एकूण 90 लोकांनी रक्तदान केले.
रक्त दान हे सर्वश्रेष्ठ दान आहे असे मनोगत सिंदेवाही पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री कांचन पांडे साहेब यांनी मार्गर्दर्शन करता म्हटले.या वेळी सिंदेवाही पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी, पत्रकार, व्यापारी संघ उपस्तिथ होते.






