श्री अमोल निनावे
संपाद्क:-झुंज सत्याची
मो. नं 9764271316
नवरगाव : सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर येथील सुनीता दिलीप मेश्राम गृह उद्योग चालवीत असुन महीलांना रोगगार उपलब्ध करून दिला. त्यांच्या कार्याची दखल महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई, शाखा सिंदेवाही च्या वतीने स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
महीलांना एकञीत करून यशस्वी महिला स्वयंसहाय्यता समुहाची स्थापना केली आणि मागील १३ वर्षापूर्वी पञावळी गृहउद्योग सुरु केला. आजही सदर गृहउद्योग सुरु असुन गटातील महीलांना रोजगारासह आर्थीक उत्पन्नाचे स्ञोत निर्माण करुन कुटुंबाच्या आर्थीक उत्पन्नात व विकासात भर पडली. त्यामुळे या समुहाला २०१७ मध्ये जिल्हास्तरावर तालुका प्रथम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यासह पंचायत समिती सिंदेवाही येथेही सत्कार करण्यात आला. उत्कृष्ठ नेतृत्व व नियोजन म्हणून तहसील कार्यालय सिंदेवाही च्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून १० मार्च २०२५ सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई, तालुका शाखा सिंदेवाही च्या वतीने वर्धापन दिनाचे औचित्य साधून नुकताच पशुधन विकास अधिकारी डॉ विनोद सुरपाम यांच्या हस्ते व वन प्रकल्पाचे सहायक व्यवस्थापक व्यंकटरमण जंगीडवाड, नगरसेवक युनुसभाई शेख, पञकार संघाचे अध्यक्ष वहाब अली सैय्यद, सचिव सचिन रामटेके व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत सुनिता दिलीप मेश्राम यांना उत्कृष्ठ गृहउद्योजक पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले.






