श्री अमोल निनावे
संपाद्क:-झुंज सत्याची
मो. नं. 9764271316
सिंदेवाही :-महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई तालुका शाखा सिंदेवाही जिल्हा चंद्रपूर च्या वतीने वर्धापन दिनानिमित्त दिव्यांग बांधवांना खाद्यकीट वितरण व उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सत्कार सोहळा दिनांक 31 डिसेंबर 2025 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण सोसायटी च्या हॉलमध्ये संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पशुधन विकास अधिकारी डॉक्टर विनोद सुरपाम हे होते. कार्यक्रमाचे उद्घाटन व्यंकटरमण जंगीडवाड सहाय्यक व्यवस्थापक वन प्रकल्प चंद्रपूर यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रमुख पाहुणे युनुस भाई शेख अध्यक्ष निराश्रीत निराधार लोकसेवा प्रकल्प सिंदेवाही तथा नगरसेवक, वहाब अली सैय्यद अध्यक्ष महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई तालुका शिंदेवाडी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
सत्कारमूर्ती माननीय रणधीर मदारे पोलीस अमलदार पोलीस स्टेशन सावली, माननीय जमील अहमद शेख सेवानिवृत्त मुख्याध्यापक कळमगाव गन्ना, माननीय सुनील भाऊ गवारे संचालक मॉं तुलसी लॉन सिंदेवाही,सौ.सुनीता दिलीप मेश्राम गृह उद्योग पुरस्कृत, सुरेखा ठाकरे झाडपट्टी नाट्यकलावंत, गुरुदास भरडकर दिव्यांग सेवक, आंतरराष्ट्रीय क्रीडापटू कृतिका बल्लेवार आदींचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी मान्यवरांचा हस्ते दिव्यांग बांधवांना खाद्यकीट वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वहाब अली सैय्यद यांनी केले.
माननीय जंगीडवाड साहेब,नगरसेवक युनूस शेख, पत्रकार अमोल निनावे, पत्रकार कपिल मेश्राम, जमील अहमद शेख ,मा.रणधीर मदारे,आदींनी मार्गदर्शन केले.
माननीय विनोद सुरपाम यांनी अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई तालुका शाखा सिंदेवाही च्या या उपक्रमाला निरंतर आमचा सहकार्य राहील आणि हा उपक्रम उल्लेखनीय आहे.
कार्यक्रमाचे संचालन गणेश खडसे व सुनील गेडाम केले.
आभार प्रदर्शन अरविंद सिडाम यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई तालुका शाखा सिंदेवाही चे सचिव सचिन रामटेके, विजय बलगेवार, अरविंद सिडाम, रवी खोब्रागडे, धनराज सरपाते, एडवोकेट नंदकुमार गंडाटे आदींनी अथक परिश्रम केले.






