श्री अमोल निनावे
संपाद्क :-झुंज सत्याची
नवरगाव येथील बसस्टॅण्ड चौक परिसर अतिक्रमणाच्या विळख्यात असताना सुद्धा ग्रामपंच्यात कमेटी तसेच ग्रामसेवक यांचे मौन व्रत
निवडून दिलेले कमिटीचा काम विकास कामासाठी कि फक्त नावासाठी अशी चर्चा
सिंदेवाही :- तालुक्यात लोकसंख्येने सर्वात मोठे ग्राम पंचायत असलेल्या नवरगाव येथील बस स्थानक परिसर तसेच प्रत्येक चौक अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला असून रहदारीच्या रस्त्यावर गुजरी भरने तसेच गांधी चौक, आझाद चौक, गुरुदेव चौक या ठिकाणी अनेक लोक आपल्या चारचाकी गाड्या रस्त्यावरती ठेवून पार्किंग लावत असल्याने समोरील कोणते वाहन येत आहे ते कळत नाही, तसेच गुरे, ढोरे रस्त्यावरतीच बाधने, दुकानदार आपले सामान रस्त्यावरीतच ठेवणे असे अनेक अतिक्रमण नवरगावच्या मार्गावरती आहे. त्यामुळे मार्गावरून ये – जा करणाऱ्या नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. ग्राम पंचायत पदाधिकारी व प्रशासन याकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत असल्याने सदर चौकात अतिक्रम वाढलेले आहे. नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन सदर चौकातील अतिक्रमण तात्काळ हटविण्यात यावे अशी मागणी सामाजिक युवा ब्रिगेडचे अध्यक्ष अमोल निनावे यांनी केली होती मात्र ग्रामपंच्यात कमिटीने फक्त त्यांना नोटीस देऊन आपले हात झटकून दिले रीतसर कार्रवाही कोणतीहि केली नसल्याने ग्रामपंच्यात कमेटी तसेच ग्रामविकास अधिकारी यांच्या वरती प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे.
सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव हे राजकीय दृष्ट्या, आणि शैक्षणिक क्षेत्रात प्रसिद्ध असलेले गाव असून मागील काही वर्षापासून या गावाला तालुक्याचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी सुद्धा करण्यात आली आहे. नवरगाव येथील बस स्थानक हे गावाच्या मध्यभागी असून याच ठिकाणी बसेस येऊन थांबत असतात. मात्र मागील काही दिवसांपासून सदर चौकातील प्रत्येक रस्त्याच्या बाजूला रोडवरती पाणठेले, चाय टपरी लागले असून सायंकाळी 4 वाजता पासून याच चौकात गुजरी भरत असल्याने भाजीपाला विक्रेते रस्त्यावर बसून आपला व्यवसाय करीत असतात मात्र त्यांना योग्य जागा मिळत नसल्याने ग्रामपंचायत्नी त्यांना जागा उपलब्ध करून द्यावे जेणेकरून ते रस्त्यावरती बसणार नाहीत. . त्यामुळे सदर चौकातून दुचाकी, चारचाकी गाडी कशी न्यायची ? असा प्रश्न नागरिकांना पडलेला आहे. तसेच बस स्थानक जिथे आहे. त्याच ठिकाणी ग्राम पंचायत कार्यालयाची नवीन इमारत झाली असल्याने ग्राम पंचायत भवन समोर अनेकजण आपापल्या गाड्या पार्किंग करीत असतात. त्यामुळे मागील काही दिवसापासुन बस स्थानक वर येणारी बस गावाच्या बाहेर अंतरगाव फाट्यावर थांबत असून वृद्ध नागरिक प्रवाश्यांना एक किमी अंतर पायी चालावे लागत असल्याने याचा मनस्ताप वृद्ध नागरिक यांना झालेला आहे. ऐन ग्राम पंचायत कार्यालयाचे समोर असलेल्या चौकाला अतिक्रमण धारकांनी विळखा घातला असताना सुद्धा ग्राम पंचायत प्रशासन मात्र मुंग गिळून गप्प असल्याने चौकाचे विद्रुपीकरण तर झालेच, आणि त्याचा फटका नागरिकांना बसत आहे. तसेच गावातील प्रत्येक रस्त्याच्या कडेला नागरिक आपले जनावरे बांधत असून अनेकांनी रस्त्यावर गिट्टी, रेती, सलाख, ठेवली असल्याने रहदारी करताना नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे ग्राम पदाधिकारी यांनी तात्काळ या समस्येकडे गांभीर्य पुर्वक लक्ष घालून नवरगावातील मुख्य चौक असलेल्या बस स्थानक परिसरातील रस्त्यावरचे अतिक्रमण काढून चौक खुला करण्यात यावा. निवडणूक काही महिन्यातच होणार असल्याने जुने असलेली कमिटी थंड तर नाही झाली असणार नं अशी चर्चा नवरगाव मध्ये रंगलेली आहे.






