श्री अमोल निनावे
संपाद्क:-झुंज सत्याची
मो. नं. 9764271316
सिंदेवाही तहसील मध्ये ग्राहकांच्या अधिकार बद्दल माहिती देण्याकरिता ग्राहक दिन साजरा करण्यात आला. दीपक देशपांडे यांनी ग्राहक, ग्राहक चळवळ, ग्राहक दिनाचा इतिहास आणि कार्यक्रमाचे आयोजनाचा उद्देश विशद करताना प्रशासन आणि ग्राहक चळवळीत सक्रिय पदाधिकारी कार्यकर्ते यांनी ग्राहक संरक्षण अधिनियमानुसार ग्राहकांच्या हक्कांबाबत जनजागृती करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे व यात कुठेतरी कोताई होत असल्याने या कार्यक्रमाच्या आयोजनाचा मुळ उद्देश मागे टाकला जात असल्याने आज ३९वर्षे पूर्ण झाली असली तरीही जनतेला आपल्या अधिकारांची जाणीव झालेली नाही व त्यामुळे पदोपदी शोषण फसवणूक केल्या जात आहे.
आपणही आपले प्रेरणास्थान बिंदू माधव जोशी यांना जर मानतो तर त्यांच्या कार्याचा गौरव प्रचार प्रसार करताना मी या संघटनेचा तो त्या संघटनेचा हा भेदभाव विसरून सर्वसामान्य नागरिकांना ग्राहक म्हणून त्यांची जशीकशी फसवणूक होत असेल आणि ती समस्या आपल्या पुढे आली तर माझ्याकडे तक्रार नाही तर मी कसे कार्य करु म्हणून वाट बघण्यापेक्षा त्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, आणि गरज असेल तर सारखी उद्दिष्टे असलेल्या संघटनांचीही मदत घेताना मागेपुढे बघण्याची आवश्यकता नाही, आणि आपण एकत्रितपणे कार्य केले तर समाजातही एक चांगला संदेश जाईल आणि आपल्या कार्याची सराहनाच होईल असेही स्पष्ट मत व्यक्त केले.
परिसरात असणाऱ्या अनेकानेक समस्या सोडविण्यासाठी ग्राहक चळवळीत कार्यरत पदाधिकारी यांनी ग्राहकांना या कायद्यातील तरतुदी पटवून देणे व मदतीसाठी प्रशासनासमोर मैत्रीपूर्ण संबंध स्थापित करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करताना प्रशासकीय यंत्रणेची उदासीनता आणि असहकाराची भुमिका यांमुळे अनेक प्रश्न निर्माण होत असल्याची खंतही व्यक्त केली.
आपल्या घणाघाती वक्तव्यातून ग्राहक फसवणुकीच्या अनेक प्रकारांचा आणि संघटनेच्या माध्यमातून केलेल्या पाठपुराव्यामुळे मिळालेल्या यशाचीही विस्तृत माहिती याप्रसंगी सभेसमोर ठेवली ,आणि वेळ मिळेल तर…. तक्रार येईल तर… या प्रकारापासून दूर राहून ग्राहक चळवळीत कार्यरत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काम करण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले.
सिंदेवाही तहसील कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन २४डिसेंबर निमित्ताने आयोजित एका कार्यक्रमात कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी नायब तहसीलदार सागर वाहाने तर प्रमुख अतिथी म्हणून दीपक देशपांडे अध्यक्ष जागृत ग्राहक राजा नागपूर विदर्भ प्रांत ,तर अतिथी म्हणून रमेश डांगरे,व डॉ आनंदराव कुळे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य जागृत ग्राहक राजा व प्रशांत गेडाम, आक्रोश खोब्रागडे,व अमोल निनावे ग्राहक पंचायत महाराष्ट्र चे सिंदेवाही तालुका पदाधिकारी तसेच प्रशांत कामडी,थामदेवजी आगळे, दिनकर बोरकर आदी जागृत ग्राहक राजा सिंदेवाही तालुका पदाधिकारी यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात ग्राहक गीत गायनाने करण्यात आली ,अतिथींचे स्वागत झाल्यानंतर प्रास्ताविक सिंदेवाही येथील आक्रोश खोब्रागडे यांनी केले तर रमेश डांगरे चंद्रपूर जिल्हा कार्यकारिणी सदस्य जागृत ग्राहक राजा यांनी ग्राहकाची व्याख्या कर्तव्य आणि अधिकार यांविषयी माहिती दिली, फसवणुकीच्या प्रकारांचा उहापोह केला व सजग राहून खरेदी व्यवहार करण्याची आवश्यकता प्रतिपादन केली.
डॉ आनंदराव कुळे चंद्रपूर जिल्हा कार्यकारिणी सदस्य जागृत ग्राहक राजा यांनी ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजना, वजनमापांतील तफावत व इलेक्ट्रॉनिक काट्यांमुळे होणारी फसगत, शेतकऱ्यांना होणारा नाहक त्रास व त्याविरोधात संघटनशक्तीची आवश्यकता प्रतिपादन केली.
याप्रसंगी विठ्ठल कामडी आणि श्रीधर वाढई यांनी आपल्या समस्या मांडल्या.
अध्यक्षस्थानी असणाऱ्या सागर वाहने नायब तहसीलदार यांनी ग्राहकांचे अधिकार आणि फसवणूक टाळण्यासाठी ग्राहक संघटनांची महत्वाची भूमिका असून त्यांनी ग्राहक संरक्षण अधिनियमानुसार ग्राहकांच्या हक्कांबाबत जनजागृती करणे, आणि ती ग्रामपातळीवर जाऊन करण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले, आणि विविध ग्राहक संघटनांच्या माध्यमातून ते सहज शक्य होऊ शकेल त्यासाठी प्रशासनही सहकार्य करेलच अशी ग्वाही दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन शरद लोखंडे पुरवठा निरीक्षक पुरवठा विभाग तहसील कार्यालय सिंदेवाही यांनी केले,या कार्यक्रमाला सिंदेवाही तालुक्यातील विविध गावांतील नागरीक, महिला, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






