थोडक्यात प्रवासांचे जीव वाचले
चनबनवार यांच्या ट्रॅक्टर वरती झाली कारवाही
श्री अमोल निनावे
संपाद्क:-झुंज सत्याची
मो. नं. 9764271316
सिंदेवाही वरून चिमुरला जाणाऱ्या 4 वाजताच्या बसला रत्नापूर फाट्यावरती प्रवाशी उतरवीत असताना भर धाव वेगात असलेल्या अवैध रेतीच्या ट्रॅक्टरनी बसच्या मागच्या बाजूला धडक दिल्याने एकच खळबळ माजली होती.
धडक इतकी भीषण होती कि बस चा मागचा भाग अक्षरशः चेंदा मेधा झालेला होता. त्यामुळे प्रवाशी मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अखेरीस हि माहिती सिंदेवाही पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री कांचन पांडे यांना दिली असता लगेच त्यांनी आपली टीम पाठवून ट्रॅक्टर वरती कारवाही करून समोरील तपास करीत आहेत.
सिंदेवाही तालुक्यात मोठ्या प्रमाणात भर दिवसा रेतीचे उत्तखनन सुरु असताना महसूल विभाग झोपेचे सोंग घेऊन तर नाही नं अशी चर्चा जनतेत सुरु आहे.
सिंदेवाही च्या तहसीलदार मॅडमला विचारणा केली असता त्या म्हणतात कि आम्ह्चे कर्मचारी यांची दिवसा आणि रात्रोला ड्युटी लागल्या असून कोणतेच अवैध रित्या वाहतूक होऊ देत नाही मग हे काय आहे असे प्रश्नजनता उपस्तिथ करीत आहेत. नवीन आलेल्या तहसीलदार मॅडम अवैध वाहतूक होणाऱ्या रेतीला आळा घालतील कि त्यांना खत पाणी घालतील याकडे आता सिंदेवाही तालुक्यातील लोकांचे लक्ष्य लागलेले आहे.अजूनही त्या ट्रॅक्टर ला तहसील मध्ये लावण्यात आलेले नाही.






