गुजरी भरते भर रस्त्यावरती
चौका चौका चार चाकी वाहन उभे करून तसेच पानठेले लावून केल्या गेले अतिक्रमण
श्री अमोल निनावे
संपाद्क:-झुंज सत्याची
मो. नं. 9764271316
सिंदेवाही तालुक्यातील सर्वात मोठे गाव तसेच सर्वात मोठी ग्रामपंच्यायत असलेल्या नवरगाव या ठिकाणी चार हि बाजूने रोडचे अवलोकन केले असता प्रत्येक रस्त्याच्या बाजूला रोडवरती काही लोकांचे गुरेढोरे बांधलेले आढतात, काही ठिकाणी तर चक्क विटा, गिट्टी, रेतीचे ढग चौका चौकात ठेवलेले असतात. तसेच बस स्थानक जिथे आहे तिथेच गुजरी भरत असल्याने भाजीपाला विक्रेते भर रोड वरतीच बसत असल्याने चार चाकी तसेच दोन चाकी वाहन कसे नायचे असे प्रश्न सुद्धा आता प्रवास करणाऱ्या लोकांच्या मनात पडलेले आहे.
नवीन ग्रामपंच्यात हि बस स्थानक जिथे आहे तिथे सुरु झाली असून त्यांच्या समोर अतिक्रमण धारक रोडची जागा व्यापून धरलेली आहे हे दिसत असताना सुद्धा ग्रामपंच्यात पदाधिकारी डोळे झाक करताना आढळून येत आहेत.
या अतिक्रमण मुळे जी सिंदेवाही ते चिमूर बस हि बस्थानक वरती नं जाता ती अंतरंगाव फाट्या वरूनच डायरेक्ट सिंदेवाही किंवा चिमुरला जात असल्याने अनेक बुजरूक लोकांना फाट्या वरून 1km प्रवास पायदळी तुडवत जावे लागत असल्याने नवरगाव वाशीय जनते मध्ये नाराजीचे सूर वाहू लागले आहे. त्यामुळे खास करून ग्रामपंच्यातचे कमेटी तसेच शासकीय पदाधिकारी यांनी या विषयाकडे आवर्जून लक्ष्य द्यावे जेणेकरून वाढत अतिक्रमण ला आळा बसेल तसेच लोकांचे वाहतुकीचे प्रवास सुकर होणार.अनेक लोकांनी आपले घर डायरेक्ट नाली वरती बांधले असताना सुद्धा ग्रामपंचायत फक्त बघण्याची भूमिका घेत असल्याने नेमके कारण काय ?कि समोरील निवडणूकीचे विचार करून तर ह्या गोष्टीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष्य केल्या जात आहे असे अनेक प्रश्न आता समोर येत आहे. ग्रामपंचायती मध्ये गावाचा विकास कसे करता येणार, बाहेरील लोकांना आपल्या गावाबद्दल कसे आकर्षित करता येणार याकडे लक्ष्य द्यायला पाहिजे मात्र असे होतानादिसत नाही.






