श्री अमोल निनावे
संपाद्क:-झुंज सत्याची
मो. नं. 9764271316
सिंदेवाही-लोनवाही नगरपंचायत क्षेत्रातील नागरीकांना याद्वारे कळविण्यात येत आहे की, मा.उच्च न्यायालय, मुंबई यांनी त्यांचे कडील जनहित याचिका क्र. ७१/२०१३ मधील आदेश Interim Application (Lodgin) no.29119 of 2025 (For Intervention) अन्वये आदेश पारित केलेला आहे. त्यामधील दिलेल्या सूचनेनुसार सिंदेवाही-लोनवाही नगरपंचायत क्षेत्रात रस्तावरील खड्डया बाबत प्राप्त होणा-या तक्रारींवर कार्यवाही करण्यासाठी तसेच खड्यांमुळे व उघड्या मॅनहोलमुळे अपघात झाल्यास अपघातग्रस्त नागरिकांना किंवा त्यांच्या कायदेशीर वारसांना नुकसान भरपाई देणेबाबत कार्यवाही करण्याच्या दृष्टीने समितीची स्थापना करणेबाबत निर्देश दिले आहेत.
त्यानुसार जनहित याचिका क्र.७१/२०१३ च्या अनुषंगाने मा.उच्च न्यायालय, मुंबई यांनी दिलेल्या निर्देशांनुसार अपघात झाल्यास अपघात धारकास किंवा त्यांच्या कायदेशीर वारसांना नुकसान भरपाई देणेकरिता सिंदेवाही-लोनवाही नगरपंचायत क्षेत्राकरीता खालील प्रमाणे गठीत करण्यात आली आहे. यांची नागरीकांनी नोंद घ्यावी.
अ.क्र. नगरपंचायत क्षेत्राकरीता गठीत केलेली समिती यांचे पद समिती पदनाम
1 मुख्याधिकारी, सिंदेवाही-लोनवाही नगरपंचायत सदस्य
2 विद्यमान सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूर सदस्य
3 नगरअभियंता सिंदेवाही-लोनवाही नगरपंचायत सदस्य
4 नगर रचना सहाय्यक, सिंदेवाही-लोनवाही नगरपंचायत सदस्य
5 अभियंता, जलदाय व मलनिस्सारण, सिंदेवाही-लोन. न.पं. सदस्य
6 उप विभागीय अभियंता, सा.बां. उपविभाग सिंदेवाही सदस्य
7 उप विभागीय अभियंता, जि.प. (बांध.) उपविभाग मुल सदस्य
8 प्रशासकीय अधिकारी, सिंदेवाही-लोनवाही नगरपंचायत सदस्य






