प्राचार्य यादव मॅडम यांनी केले सर्व शिक्षक व विधार्थ्यांचे अभिनंदन
श्री अमोल निनावे
संपाद्क:-झुंज सत्याची
मो. नं. 9764271316
मोहाळी या गावी झालेल्या सिंदेवाही तालुका विज्ञान प्रदर्शनी मध्ये सिंदेवाही सर्वोदय कन्या विद्यालयाने या वर्षीच्या प्रदर्शनीत बहुमान पटकावत गौरवाची नवीन उंची गाठली आहे. विद्यालयाच्या उच्च माध्यमिक गटातील प्रश्नमंजुषा स्पर्धेत कु. राधा सोमेश्वर सगळाम आणि कु. ईशा संदीप रणदिवे यांनी प्रथम क्रमांक मिळवून विद्यालयाचे नावलौकिक वाढवले.
दोन्ही विद्यार्थिनींनी केलेले प्रतीकृती सादरीकरण परीक्षकांच्या विशेष प्रशंसेस पात्र ठरले. त्यांच्या मेहनतीला योग्य असा मान मिळाल्याने विद्यालयात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सिंदेवाही पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री कांचन पांडे तथा bdo सर उपस्तिथ होते. अध्यक्ष श्री योगेंद्र जैस्वाल व सचिव श्री अरविंद जैस्वाल, शिक्षकवृंद आणि मार्गदर्शक शिक्षकांनी विद्यार्थिनींना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
या यशाबद्दल दोन्ही विद्यार्थिनी तसेच मार्गदर्शक शिक्षक श्री भरडकर सर,श्री उके सर,श्री कावळे सर यांचे तसेच प्राचार्य यादव मॅडम यांचे सगळी कडून हार्दिक अभिनंदन! होत आहे.






