सिंदेवाही तालुक्यातील शेतकरी चिंतेत
बँक मध्ये बोनस करिता फॉर्म भरण्याची मुद्दत संपत असतानाच हा नवीन घोळ
श्री अमोल निनावे
संपाद्क :-झुंज सत्याची
मो. नं. 976427131
महाराष्ट्र सरकार नी येत्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांसाठी सातबाऱ्यावरती ई पीक पाहणी कम्पल्सरी केलेली होती. त्यात अनेक शेतकऱ्यांकडे मोबाईल नसल्याकारणाने ई पीक पाहणी बऱ्याच शेतकऱ्यांनी केली नव्हती. मात्र या 2025-26च्या वर्षात 90% शेतकऱ्यांनी आपल्या शेतात जाऊन ई पीक पाहणी स्वतःच्या मोबाईल नी केलेली आहे. तरीपण जेव्हा शेतकरी हा तलाठी कडे सातबारा मागायला जातो तेव्हा तुमच्या सातबाऱ्यावरती ई पीकची नोंद झालेली नाही. असे सांगितल्या जातो तेव्हा मात्र शेतकरी चिंतेत दिसून राहलेला आहे.
अगोदरच नैसर्गिक चक्रामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकशान झालेले आहे. त्यात सरकार नी निर्माण केलेल्या योजनेच्या लाभ घेण्याकरिता शेतकरी कागदपत्रे गोळा करत असतो तर त्यात सुद्धा चुकीच्या ऍप मुळे लोकांच्या नोंद होताना दिसत नाही. अश्या अनेक सरकारी योजनेला कागपत्राच्या पूर्ततेमुळे शेतकऱ्यांना सरकारी योजनेचा लाभ मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या वेर्थ्या कुणाकडे मांडावे असे अनेक प्रश्न शेतकरी बांधवाना पडलेले आहे. त्यामुळे शासनाने त्वरित या गोष्टीकडे लक्ष्य देऊन ई पीक पाहणीचे प्रमाणपत्र शेतकऱ्यांना द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांची आहे.






