घरघुती वादाचे रूपांतर झाले हाफ मर्डरमध्ये
अमोल निनावे
संपाद्क:-झुंज सत्याची
मो. नं. 9764271316
सिंदेवाही तालुक्यातील पेठगाव या ठिकाणी घरघुती वादाचे रूपांतर झाले मारहाणीत. मारहाणी मध्ये लहान मुलगा मंगल रामचंद्र शेरकुरे गंभीर जखमी तर आरोपी वडील रामचंद्र केशव शेरकुरे तसेच मजवा मुलगा जीवनदास शेरकुरे यांना सिंदेवाही पोलिसांनी केली अटक.
नित्यनिमाप्रमाणे रोज सायंकाळी घरी असलेले आई वडील आणि मुलगा हा जेवण करायला बसलेला होता, मटकी ची भाजी जखमी असलेल्या मुलाला आवडत नसल्यामुळे त्यांनी मला ही भाजी आवडत नाही दुसरी भाजी पाहिजे म्हणून ओरडत असल्याने त्याच्यात बाचाबाची सुरु झाली. बाजूला आरोपी असलेला त्याचाच मजवा भाऊ राहत असल्याने त्याला बोलण्याचे आवाज गेले आणि तो लगेच यांच्या कडे येऊन तुझे हे रोजचेच नाटक आहे म्हणून त्याला घरा बाहेर काढून काठीने तसेच कवेलूने डोक्यावरती मारहाण केली , वडीलनी पण मारण्याला सुरुवात केली. मारहाण एवढी जबरदस्त होती कि त्याला ठार मारण्याच्या उद्देशाने मारहाण करीत राहले त्यामुळे त्या लहान मुलाला डोक्याला आणि चेहराला इतका मार लागला कि बेशुद्ध अवस्थेत चंद्रपूरच्या रुग्णालयात भरती करण्यात आले. ही माहिती सिंदेवाही पोलीस स्टेशनला माहिती होताच सिंदेवाही पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री कांचन पांडे तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश मेश्राम हे आपल्या टीम सोबत घटना स्थळी दाखल झाले व लगेच कार्रवाही करून वडील तसेच मजवा मुलगा याला अटक करून पोलीस स्टेशनला आणल्या गेले. समोरील कार्रवाही sdpo जाधव सर यांच्या मार्गदर्शनात सिंदेवाही पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कांचन पांडे तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश मेश्राम हे करीत आहेत.






