वनविभाग यांनी वानरांचा बंदोबस्त करावे
हाकलन्यास गेल्यास अंगावरती धावून येतात
अमोल निनावे यांच्या घरी 4 किलो चण्याची डाळ वाडू टाकलेली केली चकणाचुर
श्री अमोल निनावे
संपाद्क:-झुंज सत्याची
मो. नं. 9764271316
सिंदेवाही मधील लोणवाही या ठिकाणी सध्या रोजच या आठवड्यात वानरांची (बंदरांची)टोळी फिरताना दिसत आहे. अश्यातच आज मोठ्या प्रमाणात मोठं मोठे असलेली वानरे हे सामाजिक युवा ब्रिगेड संस्थेचे अध्यक्ष्य तथा पत्रकार यांच्या घरी जाऊन, त्यांच्या घरी अंगणात वाडू टाकलेली चण्याची दाळ तसेच तिर व तुरीची झाडे, वालांची झाडे, फुल झाडे सर्व खाऊन घेतल्याने तसेच त्यांना हाकलण्यास गेल्यास अंगावरती धावून येतात. त्यामुळे लोणवाही परिसरात आता वाघ नंतर बंदराची भीती निर्माण झालेली आहे त्यामुळे वनविभागचे अधिकारी यांनी याकडे लक्ष्य देऊन काही उपाययोजना करता येणार का तसेच गावातून त्यांना हाकलून लावता येणार का या कडे लक्ष्य देण्याची मागणी लोणवाही नगरवाशीय जनतेनी केली आहे.
रोज छोटे मुले अंगणात खेडत असतात अश्या वेळेस बंदरांची टोळी येऊन हल्ला केल्यास कोन जिम्मेदार असणार. त्यामुळे त्वरित वनविभागाने बंदोबस्त करावे.






