अमोल निनावे
संपाद्क:-झुंज सत्याची.
मो. नं. 9764271316
आज दि. 15 नोव्हेंबर 2025 रोज शनिवारला सकाळी 8.00 वाजताच्या दरम्यान वासेरा वरून काही कामानिमित्य ट्राली व ट्रॅक्टर घेऊन जात असताना जामसाळा नवीन रोडवर ट्रॅक्टर पलटी झाली. त्यात तिघे जण गंभीर जखमी झाले. त्यांना घटनास्थळावरून उपचारासाठी ब्रम्हपुरीला नेण्यात आले. जखमी मध्ये 1) सचिन सेवानंद बोरकर वासेरा 2) दिक्षांत गिरमा शेंडे वासेरा 3) प्रणय पेंदाम वासेरा असे तिघे झन होते.
मात्र ट्रॅक्टर पलटी झालेल्या अपघातात सचिन सेवानंद बोरकर वासेरा यांचे ब्रम्हपुरी येथे उपचारा दरम्यान दुःखद निधन झाले आहे. तो त्याचा घरचा आई वडीलांना एकुलता एक मुलगा होता त्यामुळे त्यांच्यावरती दुःखाचा डोंगर कोसळला असून, गावात शोककळा पसरली आहे.





