नवीन तहसीलदार येण्याच्या प्रतीक्षेत
श्री अमोल निनावे
संपाद्क:-झुंज सत्याची
मो. नं. 9764271316
सिंदेवाही तहसील कार्यालयात अनेक दिवसापासून तहसीलदारचे पद रिक्त असून अजूनही त्या पदावरती अधिकारी रुजू झालेले नाही.
तशीलदारचे तात्पुरती पदभार म्हणून नायब तहसीलदार यांना पद दिले होते मात्र त्यांची प्रकृति अचानक बिघडल्याने ते पद आणखी खाली झाले त्यामुळे येत्या महिन्यात अनेक लोकांना फक्त तहसील मध्ये येरजाऱ्या मारण्यापलीकडे कोणतेही काम होताना दिसत नाही.
तहसीलदार हे रुजू झाले नसल्यामुळे कर्मचारी सुद्धा लोकांना आज ये उद्या या, लिंक नाही आहे असे बहाणे बनवून केवळ आणि केवळ टाईमपास करण्याचे काम सध्या सुरु ठेवले आहे असे अनेक लोकांच्या मुखातून एकाला मिळत आहे. त्यामुळे स्थानिक अधिकारी लवकरात लवकर रुजू करावे अशी मागणी सिंदेवाही तालुक्यातील लोकांन कडून होत आहे.






